WTC Final : अजिंक्य रहाणेचं शतक! कसोटीत घेतल्या 100 कॅच

मुंबई तक

• 05:00 PM • 08 Jun 2023

Ajinkya Rahane completes 100 test catches : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 100 वी कसोटी कॅच घेतली आहे.

wtc final ind vs aus ajinkya rahane completes 100 test catches

wtc final ind vs aus ajinkya rahane completes 100 test catches

follow google news

Ajinkya Rahane completes 100 test catches : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 100 वी कसोटी कॅच घेतली आहे. या त्याच्या कामगिरीमुळे आता त्याने दिग्गज खेळाडूंच्या पक्तीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्या या अनोख्या रेकॉर्डची चर्चा होतेय. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 वर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर भारताचा पहिला डाव चांगलाच गडगडला आहे. भारताने 4 विकेट गमावून 100 धावा गाठल्या आहेत. (wtc final ind vs aus ajinkya rahane completes 100 test catches)

हे वाचलं का?

मोहम्मज सिराज सामन्याची 122 वी ओव्हर टाकायला आला होता. यावेळी पॅट कमिन्स क्रिजवर होता. मोहम्मज सिराजने टाकलेला बॉल पॅट कमिन्सच्या बॅटला लागून थेट अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) हातात गेला. अजिंक्य रहाणेने ही कॅच घेऊन कसोटी कारकिर्दीतली 100 कॅचचा पल्ला गाठला. त्यामुळे अजिंक्य रहाणे टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये कॅचचं अनोखे शतक साजर केले. या त्याच्या विक्रमाने त्याने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

हे ही वाचा :  काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात, ओडिशा रेल्वे अपघाताशी कनेक्शन

आतापर्यंत कसोटीत सर्वांधिक कॅच घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावे आहेत. राहुलने कसोटीत 209 कॅच घेतल्या आहेत. त्यानंतर वीवीएस लक्ष्मणचा नंबर लागतो. वीवीएस लक्ष्मणने कसोटीत 135 कॅच घेतल्या आहेत. यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंड़ूलकरचा नंबर लागतो. त्याने 115 कॅच घेतल्या होत्या. तर विराट कोहलीने 109 कॅच घेतल्या होत्या. विराट नंतर सुनील गावस्करने 108 कॅच घेतल्या. यानंतर मोहम्मद अझरूद्दीनने 105 कॅच घेतल्या. अजिक्य रहाणेने आता या पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्याने कसोटीत 100 कॅच घेतल्या आहेत.

कोणत्या खेळाडूच्या नावे किती कॅच?

राहुल द्रविड : 209
वीवीएस लक्ष्मण : 135
सचिन तेंडूलकर : 115
विराट कोहली : 109
सुनील गावस्कर : 108
मोहम्मद अझरूद्गीन : 105
अजिंक्य रहाणे : 100

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. उस्मान ख्वाजा शुन्य धावा करून बाद झाला.त्यानंतर मार्नस लाबूशेन 26 धावावर आऊट झाला. डेविड वॉर्नर मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असताना तो 43 धावावर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने मोठी भागिदारी केली. ट्रेविस हेडने 163 धावा आणि स्टीव्ह स्मिथच्या 121 धावा करून ऑस्ट्रेलियाला एका यथोच्छ स्थानी पोहोचवले. त्यानंतर अॅलेक्स केरीने 48 धावा केल्या. बाकी इतर खेळाडू एकेरी दुहेरी धावा करून बाद झाले आणि ऑस्ट्रेलिया 469 धावावर ऑल आऊट झाली.टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. रविंद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

    follow whatsapp