Malhar Patil on Omraje Nimbalkar : धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांमध्ये त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे. याउलट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रभावी कामगिरी करत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी सत्तेवर आपला ठसा उमटवला आहे. दरम्यान, यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुलाने म्हणजे मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर जोरदार टीका केलीये.
ADVERTISEMENT
मल्हार पाटील ओमराजे निंबाळकरांवर टीका करताना काय म्हणाले?
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत धाराशिव नगरपालिकेतील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय बिकट अवस्था होती. त्यामुळे शहरवासीय परिवर्तनासाठी उत्सुक होते. शहरात काहीतरी चांगले, प्रगतशील घडावे, असे स्वप्न प्रत्येक शहरवासीय पाहत होता. याच अपेक्षेतून मायबाप जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला असून, त्या विश्वासाबद्दल आम्ही मनापासून ऋणी आहोत, असे मत मल्हार पाटील यांनी व्यक्त केले.
विरोधकांनी वैयक्तिक टीका केली असली तरी जनतेने भाजपला ठाम साथ दिली. याबाबत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, या मतदारसंघातील आमदार आणि जिल्ह्याचे खासदार सातत्याने “आमचा माज उतरवणार, भाजपच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते आणि मल्हार पाटील यांचा माज उतरवणार,” अशी भाषा करत होते. मात्र, मायबाप जनतेने त्यांचा माजमस्ती खड्डे पडलेल्या रस्त्यावर नेऊन टाकली आहे.
धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला घवघवीत यश मिळाले असून, महाविकास आघाडी किंवा उभाटासह कोणत्याही पक्षाला साधा नगराध्यक्षही निवडून आणता आलेला नाही. धाराशिव शहरात केवळ सात ते आठ ठिकाणीच विरोधकांचे नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून मायबाप जनतेने त्यांची औकात दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.
दरम्यान, “मी या दोन्ही लोकप्रतिनिधींना, जे जनतेतून निवडून आले आहेत, खुले आव्हान देतो. भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या दोन्ही खासदारांना आणि भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे. धमक असेल तर उबाठाचा जिल्हा परिषद उमेदवार निवडून दाखवा, धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा,” असे ओपन चॅलेंज मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना दिले.
धाराशिवमध्ये नगपालिका निवडणुकांमध्ये काय घडलं?
नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकांत भाजप आणि शिंदे गटाची संघटन क्षमता स्पष्टपणे दिसून आली. तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरूम या नगरपरिषदांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली, तर उमरगा, कळंब आणि परंडा येथे शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले. दरम्यान, भूम नगरपरिषदेत मात्र मोठ्या राजकीय पक्षांना धक्का देत स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला.
तुळजापूर नगरपरिषदेत भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्षपदी निवडून आले असून, एकूण 23 पैकी 18 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. नळदुर्ग नगरपरिषदेत भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष झाले असून, येथेही भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. मुरूम नगरपरिषदेत भाजपाचे बापुराव पाटील यांनी निर्विवाद आघाडी घेत अध्यक्षपद पटकावले आहे.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने उमरगा, कळंब आणि परंडा या नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळवत आपली ताकद सिद्ध केली. उमरग्यात किरण गायकवाड अध्यक्ष झाले असून, शिंदे गटाने येथे 12 जागांवर विजय नोंदवला आहे. कळंब नगरपरिषदेत झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी 2,254 मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपद आपल्या नावावर केले. परंडा नगरपरिषदेतही शिंदे गटाचे जाकीर सौदागर अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बार्शी : नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय, दिलीप सोपलांना मोठा धक्का
ADVERTISEMENT











