घायल हू इसलिये घातक हूं, भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर मोहिते पाटलांची 'धुरंदर' डायलॉगबाजी अन् डान्स VIDEO

Dhairyasheel Mohite Patil dance Video and Dhurandar dialogue : अकलूज नगरपरिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला होता. मात्र निकालाच्या दिवशी मोहिते पाटील गटाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं. या विजयानंतर भाजपवर आरोप करताना धुरंदर सिनेमातील डायलॉग वापरून खासदार मोहिते पाटलांनी राजकीय संदेश दिला. त्यामुळे अकलूजच्या राजकारणात सिनेमी स्टाईल चर्चा रंगताना दिसत आहे.

Dhairyasheel Mohite Patil dance Video and Dhurandar dialogue

Dhairyasheel Mohite Patil dance Video and Dhurandar dialogue

मुंबई तक

21 Dec 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 04:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"घायल हू इसलिये घातक हूं"

point

भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर मोहिते पाटलांची 'धुरंदर' डायलॉगबाजी अन् डान्स VIDEO

Dhairyasheel Mohite Patil dance Video and Dhurandar dialogue : नगरपालिका निवडणुकीनंतर अकलूजच्या राजकारणात सध्या ‘धुरंदर’ सिनेमाची क्रेझ चांगलीच पाहायला मिळत आहे. भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधताना “घायल हू… इसलिये घातक हूं…” असा धुरंदर सिनेमातील गाजलेला डायलॉग मारला. यावेळी त्यांनी केलेली डायलॉगबाजी आणि जल्लोषातील डान्सचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

अकलूज नगरपरिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला होता. मात्र निकालाच्या दिवशी मोहिते पाटील गटाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं. या विजयानंतर भाजपवर आरोप करताना धुरंदर सिनेमातील डायलॉग वापरून खासदार मोहिते पाटलांनी राजकीय संदेश दिला. त्यामुळे अकलूजच्या राजकारणात सिनेमी स्टाईल चर्चा रंगताना दिसत आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील या निकालांवर आमदार उत्तम जानकर यांनीही जोरदार टीका केली. “या निकालाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू नये, असाच संदेश दिला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. उत्तम जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना सांगितलं की, “भाजपने अकलूजमध्ये मताला 30 हजार रुपये वाटले, तरीही त्यांचा पराभव झाला.” तसेच “जिथं सेंटिंग नाही, तिथं भाजप नाही,” असा हल्लाबोल करत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मोहिते पाटलांच्या पट्ट्यात कमळ पूर्णपणे कोमेजल्याचं चित्र असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

हेही वाचा : रावसाहेब दानवेंना मोठा झटका, भोकरदनच्या नगरपालिकेत पराभव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दानवेंच्या घरासमोर जल्लोष

अकलूज, करमाळा, कुर्डूवाडी आणि सांगोला या माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व नगरपालिकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी आपला गड राखला असून सांगोल्यातही भाजपविरोधात मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष साथ शहाजी बापू पाटील यांना लाभल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘मोहिते पाटील पॅटर्न’ दिसून आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘मिशन लोटस’ला या निकालाचा मोठा फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. भाजपचा अति आत्मविश्वासच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला आणि मंगळवेढा या पाचही नगरपालिकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. पंढरपूर नगरपालिकाही भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये मोहिते पाटील गटाचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

अकलूज नगरपरिषदेच्या निकालाकडे पाहिल्यास एकूण 13 प्रभागांतील 26 जागांपैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तब्बल 22 उमेदवार विजयी झाले, तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रेश्मा आडगळे यांनी भाजपच्या पूजा कोथमीरे यांचा 2793 मतांनी पराभव केला. या निकालामुळे माजी आमदार राम सातपुते यांना मोठा धक्का बसला आहे. एकंदरीत, अकलूजपासून माढा लोकसभा मतदारसंघापर्यंत भाजपचा पराभव आणि त्यानंतर मोहिते पाटलांची धुरंदर डायलॉगबाजी सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा, नेतृत्वात लढलेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ

 

 

 

 

 

 

 

 

    follow whatsapp