Nagar parishand Uran : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अशातच उमेदवारांची धाकधुक वाढलेली दिसत आहे, तर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याच उरणमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. नाष्ट्याच्या कॉन्ट्रॅक्टवरून एका व्यक्तीने स्ट्रँगरुमच्या दिशेने गेल्याचा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाजप 140 ते 152 जागा जिंकणार, महाराष्ट्रातील इतर एकही पक्ष 50 चा आकडा गाठणार नाही, Exit Poll ची आकडेवारी
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्षेप
याच प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत आरोप केले आहे. मतमोजणीस सुरुवात झाली आहे. हा प्रकार घडल्याने मतमोजणी केंद्रावर काही काळ मोठा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे घटनास्थळी मोठी खळबळ माजल्याचे वृत्त समोर आले आहे.
हे ही वाचा : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचे केवळ 2 नगराध्यक्ष निवडून येणार, तर ठाकरेंचा 1; नगरपरिषद निवडणुकीचा Exit Poll
व्यक्ती स्ट्रँग रुमकडे गेला कसा?
दरम्यान, मतमोजणी सुरु होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना हा व्यक्ती स्ट्रँग रुमकडे गेला कसा? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकारानंतर मतमोजणी केंद्रावर मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व प्रकारानंतर मतमोजणी केंद्रावर मोठा राडा निर्माण झालेला दिसून येत आहे.
ADVERTISEMENT











