सिक्सर किंग युवराज पुनरागमन करणार, सोशल मीडियावरुन दिले संकेत

मुंबई तक

• 09:54 AM • 02 Nov 2021

टीम इंडियाच्या सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे युवराज सिंग. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू म्हणून ओळख असलेल्या युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. २०११ विश्वचषक विजयाचा हिरो असलेल्या भारताच्या या माजी खेळाडूने आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची तयारी केली आहे. युवराजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या जुन्या खेळीचा एक व्हिडीओ पोस्ट करत फेब्रुवारी महिन्यात […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडियाच्या सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे युवराज सिंग. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू म्हणून ओळख असलेल्या युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. २०११ विश्वचषक विजयाचा हिरो असलेल्या भारताच्या या माजी खेळाडूने आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची तयारी केली आहे.

हे वाचलं का?

युवराजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या जुन्या खेळीचा एक व्हिडीओ पोस्ट करत फेब्रुवारी महिन्यात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.

सोशल मीडियावर स्वत:चा हा व्हिडिओ पोस्ट करताना युवराजने लिहिले आहे की, “तुमचं नशीब देव ठरवतो. जनतेच्या मागणीनुसार मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरेन. या भावनेपेक्षा माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. यासाठी मी सर्वांचा आभारी राहीन.”

युवराज सिंगने 2000 मध्ये नैरोबी येथे खेळल्या गेलेल्या ICC नॉकआउट स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि पुढील 17 वर्षे तो भारताकडून खेळला. युवराजने भारतासाठी शेवटचा सामना 30 जून 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याने 2019 मध्ये निवृत्तीची घोषणा केली.

युवराज सिंगने भारतासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 17 शतके आणि 71 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज पूर्ण फॉर्ममध्ये असताना त्याला रोखणे प्रतिस्पर्धी संघांसाठी कठीण होते. 11,000 हून अधिक धावा करण्यासोबतच त्याने 148 विकेट्स देखील घेतल्या आहेत, ज्यामध्ये दोन वेळा एकाच डावात 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे.

    follow whatsapp