इगो बाजूला ठेऊन राज साहेबांना विचारलं असतं तर, साहेबांनी…: मनसे आमदार

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: राज्यसभा निवडणुकीत मनसे कोणाला मतदान करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे मनसे भाजपला मतदान करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:04 AM • 10 Jun 2022

follow google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: राज्यसभा निवडणुकीत मनसे कोणाला मतदान करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे मनसे भाजपला मतदान करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

हे वाचलं का?

यावर मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मित्र आहेत. त्यांनी विनंती केली की तुमचा पाठिंबा तुम्ही भाजपाला देणार का? राज ठाकरेंनी देखील त्यांना सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी विनंती केली त्यामुळे आम्ही त्यांना मान दिला.’

तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेचं नाव न घेता टोला हाणत असं म्हटलं की, ‘इगो बाजूला ठेऊन राज साहेबांना विचारलं असत तर, साहेबांनी तोही विचार केला असता. परंतु काही लोक एमआयएम आणि अबू आझमीच्या मागे बिझी असल्यामुळे त्यांनी कदाचित विचार केला नसेल.’

‘आपल्या शहरात चाललेला ‘सासुरवास’ बघा’, राजू पाटलांचं खोचक ट्विट

दरम्यान, याचवेळी राजू पाटील यांनी एक खोचक ट्विटही केलं आहे. डोंबिवली ग्रामीण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. याच पाणी टंचाईची झळ ही नागरिकांना पडत असून पाणी टंचाईमुळे देसले पाड्यातील पाच जणांचा जीव गेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेने उपाय योजना केल्या असल्या तरी पाणी टंचाई अद्याप जाणवत आहे.

दरम्यान पाणी टंचाई बाबत आपण बैठक घेऊ असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र याबाबत बैठक अद्याप झाली नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा पाण्याच्या विषयावरती ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला हाणला आहे.

‘बाहेर पडलाच आहात तर सभा वगैरे नको, #KDMC त फक्त पाहणी केली तरी खूप होईल. डोंबिवलीशी नातं आहे आपलं, आपल्याच शहरात चाललेला ‘सासुरवास’ बघा. पालकमंत्र्यांना सिनेमा प्रमोशन व दौऱ्यातून वेळ मिळाला तर, त्यांनाही घेऊन या. पाण्यावाचून पाणावलेले डोळे पुसायलासुद्धा जरा वेळ द्या.’ असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.

Rajya sabha Eleciton Live Updates : धागधुग सूरू! सातव्या स्थानी कुणाचा उमेदवार राहणार?

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत मनसेने भाजपला झुकतं माप दिल्यास या कृतीचे अनेक अर्थ निघणार आहेत. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपसोबत युती करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पण राज्यसभा निवडणुकीतील मनसेचा कल हा भाजपसोबतच्या युतीसाठी उचलेलं पहिलं पाऊल नक्कीच असू शकतं.

    follow whatsapp