मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग बॅग समजू नये, असदुद्दीन ओवेसींचा इशारा

मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग बॅग समजू नये. मुस्लिम समाजाला असं वागवण्याची हिंमत कुणी करू नये असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये दिला आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या एक दिवस आधी असदुद्दीन ओवेसी यांनी हा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाजप, मनसे आणि शिवसेनेवरही टीका केली आहे. काय म्हणाले आहेत ओवेसी? “मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग […]

Mumbai Tak

मुंबई तक

30 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

follow google news

मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग बॅग समजू नये. मुस्लिम समाजाला असं वागवण्याची हिंमत कुणी करू नये असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये दिला आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या एक दिवस आधी असदुद्दीन ओवेसी यांनी हा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाजप, मनसे आणि शिवसेनेवरही टीका केली आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत ओवेसी?

“मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग बॅग समजू नये. कुणाचीही तेवढी हिंमत नाही. सध्या आपण पाहिलं तर एक सगळ्या पक्षांमध्ये एक स्पर्धा लागली आहे की आम्हीच कसे हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे. जर मी हे म्हटलं की मी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर नमाज अदा करायची आहे तर मला लष्कराकडून गोळ्या घालून ठार करतील. संजय राऊत यांनाही मी हे सांगेन की कुणाचाही उल्लेख हिंदू ओवेसी म्हणून उल्लेख करून ठाकरे बंधूंच्या वादात मला खेचू नका.”

भाजप-शिवसेना यांचं सरकार होतं तेव्हा त्यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही किंवा ही समस्या आहे असं वाटलं नाही. सध्या भाजपकडून तिरस्काराचं राजकारण केलं जातं आहे. राज ठाकरे भाजपचा हा तिरस्काराचा अजेंडा पुढे घेऊन जात आहेत. मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. सध्या राज्यं ही लोकशाहीच्या मार्गाने नाही तर बुलडोझरच्या मार्गाने चालवली जात आहेत. मुस्लिमांनी कट्टरपणा दाखवायचा ठरवला तर राष्ट्रासाठी ते चांगलं होणार नाही. देशातला कायदा आणि सुव्यवस्था सर्वोच्च आहे त्याचा आम्हाला पूर्ण आदर आहे असंही ओवेसींनी म्हटलं आहे.

तिरंगा हा आपला राष्ट्रवाद आहे याचा ठाकरे सरकारला विसर पडला आहे का?-ओवेसी

कुणाच्याही घरासोर हनुमान चालिसा वाचणं चुकीचं आहे. आम्ही भाजप नेत्याच्या घरासमोर कुराण वाचतो असे म्हटले तर बरोबर होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाऊन कुराण वाचली तर काय होईल? असाही प्रश्न त्यांनी विचारला. तसंच राज ठाकरे यांनी भाजपमध्ये कधी जाणार आहे, फक्त हे सांगावं असंही ओवेसी यांनी विचारलं आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दारूबंदीचा निर्णय का घेतला जात नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

एवढंच नाही तर ओवेसी म्हणाले की उद्या आम्हीही रॅली घ्यायला तयार आहोत. आमच्या सभेला या असं आम्ही कुणाला सांगणारही नाही. जे लोक उत्स्फूर्तपणे येतील त्यांना येऊ दे असंही ओवेसी म्हणाले आहेत.

    follow whatsapp