गुरू आणि सूर्याची होणार युती अन् या तीन राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार
Astrology 2025 : जून महिन्यांमध्ये सूर्य आणि गुरु यांच्यात संयोग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला सन्मान, आत्मविश्वास आणि सरकारी क्षेत्रात यश प्राप्त होईल.
ADVERTISEMENT

1/6
जून महिन्यामध्ये सूर्य आणि गुरु यांच्यात संयोग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहाला सन्मान, आत्मविश्वास आणि सरकारी क्षेत्रात यश प्राप्त होईल. गुरु ग्रहाला ज्ञान, संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे.

2/6
गुरु आणि सूर्य यांची युती होऊन हे दोन्ही ग्रह मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. याचा परिणाम हा सर्वच राशींवर होताना दिसतो. मात्र, त्यापैकी तीन राशींसाठी चांगले संकेत आहेत. त्या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात.

3/6
कन्या राशी
कन्या राशीतील लोकांच्या करिअर, व्यवसायात प्रगती होणार आहे. गुरु आणि सूर्याची युती झाल्यामुळे कन्या राशींच्या लोकांच्या आयुष्यात यशाचा मार्ग मोकळा असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळणार असून मेहनतीला चांगलं फळ मिळेल.

4/6
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांना नशीब चांगलं साथ देणार आहे. तूळ राशीत नवव्या घरात होणारे संयोजन तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध करुन देणार आहे. या काळात विशेष दौरा आणि धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. नोकरीत उच्च पद मिळेल. तसेच आपल्या कामाची चर्चा होऊन कौतुक होईल.

5/6
मीन राशी
मीन राशीच्या लोकांच्या संपत्तीत आणि सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. मीन राशीच्या लोकांना घर, वाहन किंवा कोणतीही मालमत्ता विकत घेता येणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ फायदेशीर आहे. मालमत्तेशी संबंधित कामं पूर्ण होतील. कुटुंबातील संबंध चांगले राहतील. आईसोबत आणखी संबंध चांगले प्रस्थापित होणार आहेत.

6/6
सूर्य आणि गुरु ग्रहाला एकत्र आल्याने काही राशींसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. अशातच ग्रहांचे परिमाण हे व्यक्तींच्या कुंडलीवरही अवलंबून असणार आहे. योग्य मार्गदर्शनासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.