Ganpati Bappa Morya: ही शान कोणाची... लालबागच्या राजाचं पाद्यपूजन, पाहा खास फोटो
यंदा 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यासाठीच लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आज (14 जून) मंडळाच्या वतीने गणेश मुहूर्त पूजन देखील पार पाडण्यात आलं.
ADVERTISEMENT

1/7
लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेश चतुर्थी, बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंतचतुर्दशी, शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे.

2/7
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला.

3/7
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.

4/7
लालबागचा राजा, मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणपती, 1934 मध्ये लालबाग, येथे स्थापन झाला. कोळी समाज आणि व्यापाऱ्यांनी येथे गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. ‘नवसाला पावणारा’गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे.

5/7
गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात. सेलिब्रिटी, राजकारणी देखील राजाच्या चरणी लीन होतात.

6/7
मूर्तिकार कांबळी कुटुंब गेल्या 80 वर्षांपासून राजाची मूर्ती घडवत आली आहे. दरवर्षी नवीन थीम आणि डिझाइन, देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण मूर्तीची ठेवण कायम असते जी भाविकांना कायम आकर्षित करते.

7/7
लालबागचा राजा मंडळात दानातून मोठी रक्कम जमा होते. जे गणेशोत्सवासह सामाजिक उपक्रमाकवर देखील खर्च केले जातात.