Tri Ekadash Yog 2025: 26 मे 2025 रोजी नशीब उघडणार, शनी-बुधाची युतीमुळे 3 राशींना मिळेल पैशाचं घबाड!
Astrology 2025 : शनी-बुधाची युतीमुळे 3 राशींना बक्कळ पैसे मिळणार आहे. त्या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत? हे सविस्तरपणे नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

1/5
शनि आणि बुध एकमेकांपासून 60 अंशाच्या स्थानावर असणार आहेत. ज्यामुळे 26 मे रोजी सकाळी 7.13 वाजता त्रिएकदश योग लागू होणार आहे. ज्यातिषशास्त्राच्या भाषेत 'लाभ दृष्टी' असे म्हणतात, जे विशेषत: तीन राशींच्या लोकांसाठी लाभदायक आणि शुभ मानले जातात.

2/5
शनि आणि बुध ग्रहाचा त्रिएकादश योग नेमका काय असतो?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दोन ग्रह मिळून लाभदृष्टी बनवतात तेव्हा जीवनात आर्थिक मानसिक आणि समाजिक लाभ होण्याची अधिक संभावना असते. दरम्यान, सुमारे अडीच वर्षानंतर शनि त्याच्या मूळ त्रि कुंभ राशीतून मीन राशीत आला आहे. तो 2027 पर्यंत राशीत वास्तव्य करणार आहे. या काळात तो एखाद्या ग्रहासोबत असेल. यामुळे काही राशींचे भाग्य उजळेल.

3/5
कुंभ राशी
कुंभ राशींच्या लोकांना त्रिएकदश योगामुळे आराम मिळण्याची चिन्हे आहेत. अनेक काळांपासून निर्माण होणाऱ्या अडथळांला पूर्णविराम मिळू शकतो. शिक्षण, करिअर आणि संवादातील कौशल्यात प्रगती निर्माण होईल असे ज्योतिषशास्त्र सांगत आहे. ज्यामुळे कुंभ राशीतील लोकांचा आत्मविश्वास आणखी वाढला गेला आहे. तसेच आर्थिक परिस्थिती स्थिर होणार असून भाऊ-बहिणीशी संबंध सुधारेल.

4/5
तूळ राशी
तूळ राशींच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत नवीन संधी प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढणार आहे. तुमच्या निर्णयांचे कौतुक होणार आहे. नेतृत्व कौशल्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थिरता प्राप्त होणार आहे.

5/5
वृश्चिक राशी
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी, हा योग महत्त्वाचा आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. जोडीदारांच्या नात्यांमध्ये खरेपणा असणार आहे. विवाहाची शक्यता असणार आहे. तुमच्या मुलांना आनंद मिळणार आहे आणि तुमच्या चिंता लवकरच संपणार आहेत. वृश्चिक राशींच्या उत्पन्नात वाढ होऊन नोकरी बदलणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.