महादेवाला बेल आणि धोतऱ्याचं फुल का वाहतात? नेमकं कारण काय?
Mahadev Belpatra Dhatura reason : धार्मिक श्रद्धा व्यक्त करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच आवश्यक आहे. शिवशक्ती ही पुरुष आणि प्रकृतीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वनस्पतींचे संवर्धन करणे, नवीन रोपे लावणे आणि परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प करणे अधिक महत्त्वाचे ठरते. महादेवाच्या पूजेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि भाव. पूजनसामग्री विपुल असली तरी भावनाशून्य पूजा निरर्थक ठरते; परंतु खऱ्या भक्तिभावाने केलेली साधी पूजा देखील महादेवाला प्रिय असते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महादेवाला बेल आणि धोतऱ्याचं फुल का वाहतात?
नेमकं कारण काय?
Mahadev Belpatra Dhatura reason : ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला प्रिय मानले जाणारे बेलपत्र, धोतऱ्याचं फुल यांसारखी वनस्पती केवळ तोडून अर्पण केल्याने ते प्रसन्न होत नाही. या पवित्र वनस्पतींची लागवड करून आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेऊनच महादेवाची खरी कृपादृष्टी प्राप्त होते, असे ज्योतिष शास्त्रातील जाणकार सांगतात.
आजच्या काळात अनेक जण झाडे लावण्यापेक्षा त्यांची पाने, फुले तोडून देवाला अर्पण करण्यात अधिक उत्सुक दिसतात. परिणामी, पूर्वी रानटी समजली जाणारी धोतऱ्यासारखी ही झाडेसुद्धा आता शहरांसह ग्रामीण भागात सहज दिसेनाशी झाली आहेत. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील सोमवारी बेलपत्रांच्या पूर्ण फांद्या तोडल्या जातात. मंदिरांच्या बाहेर बेलपत्र, धोतऱ्याच्या फुलांच्या किमती गगनाला भिडतात. ही परिस्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.
धार्मिक श्रद्धा व्यक्त करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच आवश्यक आहे. शिवशक्ती ही पुरुष आणि प्रकृतीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वनस्पतींचे संवर्धन करणे, नवीन रोपे लावणे आणि परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प करणे अधिक महत्त्वाचे ठरते. महादेवाच्या पूजेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि भाव. पूजनसामग्री विपुल असली तरी भावनाशून्य पूजा निरर्थक ठरते; परंतु खऱ्या भक्तिभावाने केलेली साधी पूजा देखील महादेवाला प्रिय असते.
हेही वाचा : कोल्हापूर : हॉटेल स्वस्तिकची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी दिला भर रस्त्यात चोप.., पाहा व्हिडीओ










