तिसऱ्या आघाडीच्या शक्यता आणि मर्यादा!

राजदीप सरदेसाई

आधुनिक काळातील चाणक्य कोण? असा प्रश्न जर विचारला गेला तर काहीजण अमित शाह यांचं नाव जरूर घेतील. कारण 2014 आणि त्यानंतर 2019 मध्ये भाजपला जो विजय मिळाला त्यामध्ये हे नाव अत्यंत महत्त्वाचं होतं. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची त्यासाठी कोणतंही ‘अर्थशास्त्र’ वापरलं तरीही चालतं असं एकंदरीत त्यांचं धोरण आहे. मात्र पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर राजकीय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आधुनिक काळातील चाणक्य कोण? असा प्रश्न जर विचारला गेला तर काहीजण अमित शाह यांचं नाव जरूर घेतील. कारण 2014 आणि त्यानंतर 2019 मध्ये भाजपला जो विजय मिळाला त्यामध्ये हे नाव अत्यंत महत्त्वाचं होतं. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची त्यासाठी कोणतंही ‘अर्थशास्त्र’ वापरलं तरीही चालतं असं एकंदरीत त्यांचं धोरण आहे. मात्र पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर राजकीय क्षेत्रातले चाणक्य म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपली सगळी ‘शक्ती’ पणाला लावली होती. मात्र प्रशांत किशोर यांनी हे स्पष्ट केलं होतं की काहीही झालं तरीही ममतादीदींची सत्ता येणार, घडलंही तसंच. आता प्रशांत किशोर यांना एवढ्या एका घटनेवरून चाणक्य मानलं जातं आहे का? तर तसंही मुळीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर संपूर्ण पकड असलेले शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या जेव्हा भेटी झाल्या त्याही या उपाधीला कारणीभूत ठरतात. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपला वेगळा पर्याय उभा करायचा म्हणून हे दोघे भेटले का? अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. तसंच शरद पवार यांच्या घरी झालेली राष्ट्र मंचाची बैठक. त्याच दिवशी या बैठकीच्या आधी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची झालेली भेट या सगळ्या गोष्टी सूचक आहेत. राजकारणातलं टायमिंग साधलं असं जे म्हटलं जातं तशा टायमिंग साधणाऱ्या आहेत.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचं एकत्र येणं हे तसं कदाचित थोडं पठीबाहेरचं वाटू शकतं. कारण शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेले राजकारणी आहेत. त्यांचा जनसंपर्क, त्यांची लोकनेता म्हणून असलेली प्रतिमा मोठी आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर हे टेकसॅव्ही आहेत. ब्रांडिंग आणि मॅनेजमेंटवर विश्वास असलेले रणनीतीकार आहेत. एखाद्या राजकारण्याची प्रतिमा उंचावयाची असताना आपण पडद्यामागे राहायचं असं काहीसं त्यांचं धोरण आहे. मात्र सत्तेची ताकद हाच एक समान धागा आहे ज्यांनी या दोघांना एकत्र आणलेलं असू शकतं. शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना सत्तेचा प्रदीर्घ अनुभव आहे. शरद पवार केंद्रातही मंत्री होते. त्यामुळे दिल्लीतही त्यांचा जनसंपर्क दांडगा आहेच. दुसरीकडे प्रशांत किशोर हे असे रणनीतीकार आहेत ज्यांनी आपल्या परफेक्ट अंदाजांनी अनेकांना थक्क केलं आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची जी भेट झाली त्याची चर्चा इतकी होण्याचं एक कारण असंही असू शकतं की मोदी विरोधात काही लोक एकत्र येण्यास उतावीळ आहेत. 2024 च्या आधीच भाजपला आव्हान देणं गरजेचं आहे असं या अस्वस्थ उतावीळ घटकाला वाटतं आहे. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात आणि शीतयुद्धात सुरू असलेली तिसऱ्या आघाडीची शक्यता ही मोदींना विरोध दर्शवणाऱ्या गटाला आकर्षित करते आहे. तिसरी आघाडी हा असा प्रकार आहे की जो नामशेष होणार असं वाटत असतानाच पुन्हा उभारी धरतो. 1990 च्या दशकात बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसचं सरकार अस्तित्त्वात आलं होतं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान असलेले व्ही. पी. सिंग यांनी म्हटलं होतं की ‘तिसरी आघाडी हा पर्याय कदाचित अनेकांना पटणार नाही पण तो अपरिहार्य आहे’ व्ही. पी. सिंग यांनी केलेलं हे एक वक्तव्य अशांतता, अस्वस्थता, अगतिकता सगळं दाखवणारं आहे. 90 च्या दशकात देशाने आठ सरकारं आणि सहा पंतप्रधान पाहिले. आजची राजकीय परिस्थिती बऱ्यापैकी वेगळी आहे. कमी कालावधीसाठी सरकार स्थापन करण्यात कुणालाही फारसा रस उरलेला नाही. मोदींच्या नेतृत्त्वात भाजप एक प्रबळ पक्ष म्हणून उदयास आला आहे. 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांचा निकाल हेच दर्शवून देतो. दुसरीकडे काँग्रेसची कामगिरी या दोन्ही निवडणुकांमध्ये घसरली आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी असा नियम भारतीय राजकारणातही लागू आहे. त्यामुळे ज्याच्याकडे सत्ता आहे तो मतांचं ध्रुवीकरण करू शकतो असा आपल्या देशातला साधा सरळ फॉर्म्युला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp