ग्राहकांची मज्जाच मज्जा! आज सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी घसरण, तुमच्या शहरात आजचे दर काय?
Today Gold Rate : लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून मार्केटमध्ये सोन्याला खूप जास्त मागणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
 
 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
 
 मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून मार्केटमध्ये सोन्याला खूप जास्त मागणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलं आहे.
आज 16 एप्रिल 2025 ला 24 कॅरेट सोनं जवळपास 300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमती 10 रुपयांनी घसरल्या आहेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88150 रुपये झाली आहे. महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमध्ये सोनं कोणत्या ठिकाणी किती रुपयांनी स्वस्त झालंय? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88150 रुपये झाली आहे.
पुणे
पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88150 रुपये झाली आहे.














