Zaheer khan झाला बाबा, लग्नाच्या 8 वर्षानंतर सागरिका घाटगेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवलं...
क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्रा सागरिका घाटगे यांनी त्यांच्या मुलाला जन्म दिला. या जोडप्याने यासंबंधी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या कुटूंबातील नवीन सदस्याचे स्वागत केले आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 झाहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी दिला मुलाला जन्म
 
 झाहीर आणि सागरिकाच्या मुलाचे नाव काय?
 
 झाहीर आणि सागरिकाने इंस्टाग्रामवर केला खुलासा
Zaheer Khan and Sagarika Baby: मुंबई: सुप्रसिद्ध क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्रा सागरिका घाटगे यांनी नुकताच त्यांच्या मुलाला जन्म दिला. या जोडप्याने यासंबंधी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या कुटूंबातील नवीन सदस्याचे स्वागत केले आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेहसिंह खान ठेवल्याचे इंस्टाग्राम पोस्टवरुन दिसत आहे.
इंस्टाग्राम शेअर केली पोस्ट
या जोडप्याने बुधवारी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आणि त्यांच्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या गोड मुलासोबत त्यांच्या कुटुंबाचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झाहीर खानने त्याच्या मुलाला मांडीवर धरलेले दिसत आहे तर सागरिका झाहीरच्या खांद्यांवर हात ठेवून उभी असल्याचं दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघे खुपच आनंदी असल्याचं सुद्धा दिसत आहे.
हे ही वाचा: अजित पवारांची होणारी सून ऋतुजा पाटील नेमकं काय करते?
झाहीर आणि सागरिकाने काय म्हटले?
हा सुंदर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, "प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आम्ही आमच्या गोंडस मुलाचे म्हणजेच फतेहसिंह खानचे स्वागत करतो."














