अजित पवारांची होणारी सून ऋतुजा पाटील नेमकं काय करते?
Rutuja Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होणारी सून ऋतुजा पाटील हिच्याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या कोण आहे नेमकी ऋतुजा पाटील.
ADVERTISEMENT

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय पुत्र जय पवार यांचा नुकताच साखरपुडा पाडला आहे. ऋतुजा पाटील हिच्यासोबत लवकरच त्यांची लग्न गाठ बांधली जाणार आहे. दरम्यान, ऋतुजा पाटील कोण, ती नेमकं काय करतं याबाबत सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे तिच्याविषयी नेमकी माहिती आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ऋतुजा पाटील ही साताऱ्यातील फलटण येथील उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या आहे. जय पवार यांच्यासोबत तिचा साखरपुडा 10 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील घोटावडे येथे अजित पवार यांच्या फार्महाऊसवर पार पडला.
शिक्षण
उच्चशिक्षित: ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असल्याचे समजते. तिचे शिक्षण परदेशात आणि भारतातील नामांकित संस्थांमधून झाले आहे. तिने सोशल मीडियासंबंधी काही महत्त्वाचं शिक्षण देखील घेतलं असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?
ऋतुजाचा स्वभाव सौम्य आणि संवादकौशल्य उत्तम असल्याचं बोललं जातं, जे तिच्या शिक्षण आणि वैयक्तिक विकासाचे द्योतक आहे.














