अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?
Who Is Rutuja Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नसोहळ्यात दोन्ही पवार कुटुंब एकत्रित येणार दिसणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची घेतली भेट
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिली माहिती
कोण आहेत ऋतुजा पाटील?
Who Is Rutuja Patil: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कालच (10 एप्रिल) त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. पण याच दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटील यांच्याशी होणार असून या दोघांनीही शरद पवारांची नुकतीच भेट घेतली होती. जय पवार यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जय आणि ऋतुजाचे फोटो पोस्ट केले होते. परंतु, या दोघांच्या लग्नाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच अनेकांना एक प्रश्न पडलाय. तो म्हणजे, जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील आहे तरी कोण? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची घेतली भेट
साखरपुड्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या मोदीबाग निवासस्थानी या दोघांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. तसच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांना त्यांच्या साखरपुड्याच्या पार्टीत सहभागी होण्याचं आमंत्रणही दिलं.
इतकच नव्हे तर जय आणि ऋतुजाने शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशीही गप्पा मारल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांचे कुटुंबिय एकत्रित आल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पवार कुटुंबाची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे.
हे ही वाचा >> शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिली माहिती
खासदार सुपिया सुळे पवार कुटुंबातील या सोनेरी क्षणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून सुळेंनी म्हटलंय की, ऋतुजा पाटील आता पवार कुटुंबियांची सून होणार आहे. सुप्रिया सुळेंनी जय आणि ऋतुजाने शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीचेही फोटो शेअर केले आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. पार्थ पवार आणि जय पवार. आता जय पवारच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने कुटुंबात एक नवा अध्याय जोडला गेला आहे.










