बाईईई! हा काय प्रकार...रोज रोज का वाढतायत सोन्याचे दर? आजचा भाव तर वाचा..घामच फुटेल!
Today Gold Rate : इस्त्रायल-इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : इस्त्रायल-इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आहे. अशातच आज गुरुवारी 19 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत लाखाच्या पार गेली आहे.
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 101070 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92660 रुपयांवर पोहोचले आहेत. तसच चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. आज एक किलोग्रॅम चांदीचे दर 1,11,100 रुपयांवर पोहोचले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 101080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92650 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 101080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92650 रुपये झाले आहेत.










