Personal Finance: नवा कोरा फ्लॅट घेतला पण Societyच्या नावावर जमीन नसेल तर तुमचं काही खरं नाही!

रोहित गोळे

Personal Finance Land Title Society: फ्लॅट खरेदी करताना केवळ घराची किंमत, लोकेशन आणि सुविधा न पाहता सोसायटीच्या नावावर जमिनीचा हक्क आहे की नाही, हे तपासणे का महत्त्वाचे आहे ते जाणून घ्या.

ADVERTISEMENT

personal finance flat buyers check land title society name before buying property
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
Google CTA

Personal Finance Tips: फ्लॅट खरेदी करताना आपण घराची किंमत, लोकेशन, कार्पेट एरिया, पार्किंग आणि सोसायटीच्या सुविधा याकडे बारकाईने पाहतो. मात्र ज्या जमिनीवर संपूर्ण इमारत उभी आहे, त्या जमिनीवर सोसायटीचा नेमका हक्क काय आहे, याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. हीच गोष्ट भविष्यात फ्लॅट मालकासाठी मोठी अडचण ठरू शकते. त्यामुळे फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी केवळ फ्लॅटचे कागदपत्र नव्हे, तर जमिनीचा मालकी हक्कही तपासणं महत्त्वाचं आहे.

जमीन कोणाच्या नावावर आहे हे का महत्त्वाचं? 

एखाद्या इमारतीतील फ्लॅट तुमच्या नावावर असला, तरी इमारत ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीचा हक्क वेगळ्या व्यक्ती, संस्था किंवा मूळ जमीनमालकाकडे असू शकतो. काही प्रकरणांमध्ये सोसायटीकडे जमीन आणि इमारतीबाबत आवश्यक हक्क हस्तांतरित झालेले नसू शकतात. त्यामुळे खरेदीदाराने Land Title आणि Societyचा जमिनीवरील हक्क स्पष्ट आहे का, हे तपासणं आवश्यक आहे.

कोणती कागदपत्रं तपासावीत? 

फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी जमीन आणि इमारतीशी संबंधित कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करून घेणं योग्य ठरतं. यामध्ये Sale Deed, Conveyance Deed किंवा संबंधित हक्कपत्र, Property Card/7-12 उतारा, Development Agreement, मंजूर बांधकाम कागदपत्रे आणि सोसायटीशी संबंधित कागदपत्रे यांचा समावेश होऊ शकतो.

विशेषतः Conveyance Deed झालं आहे का किंवा जमीन सोसायटीच्या नावावर कायदेशीररीत्या हस्तांतरित झाली आहे का, हे तपासणं महत्त्वाचं आहे.