Personal Finance: जमीन न घेता जमीन व्यवसायात गुंतवणूक? कमी पैशात रिअल इस्टेटचा ‘हिस्सा’

रोहित गोळे

जमीन किंवा प्लॉट खरेदी न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी REIT आणि SM REITसारखे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची रचना, जोखीम, परतावा आणि किमान गुंतवणूक समजून घेणं महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

personal finance land investment without buying land reit sm reit
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

Personal Finance Land Investment: जमीन, प्लॉट किंवा घर खरेदी करायचं म्हटलं की मोठ्या भांडवलाची गरज भासते. त्यात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, देखभाल, कायदेशीर कागदपत्रं आणि विक्रीच्या वेळी योग्य ग्राहक मिळण्याची चिंता असते. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही प्रत्यक्ष जमीन खरेदी करणं शक्य होत नाही. मात्र, जमीन किंवा प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर न घेता रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत.

REIT म्हणजे काय?

यातील सर्वात चर्चेतला पर्याय म्हणजे REIT अर्थात Real Estate Investment Trust. SEBIच्या माहितीनुसार, REITच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष प्रॉपर्टी न खरेदी करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येते. REITकडे व्यावसायिक इमारती, ऑफिस स्पेस, मॉल्स यांसारख्या मालमत्तांचा पोर्टफोलिओ असू शकतो. या मालमत्तांमधून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नातून गुंतवणूकदारांना वितरण मिळू शकते. REIT युनिट्स शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येतात. 

म्हणजेच, एक संपूर्ण इमारत किंवा जमीन खरेदी करण्याऐवजी त्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये छोटा हिस्सा घेण्याची कल्पना इथे लागू होते.

SM REIT : छोट्या प्रॉपर्टीजमध्ये वेगळा पर्याय

अलीकडच्या काळात Small and Medium REITs म्हणजेच SM REITs हा पर्यायही समोर आला आहे. SEBIने छोट्या आकाराच्या रिअल इस्टेट मालमत्तांना अशा माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र नियामक चौकट आणली आहे.