vedanta foxconn Project : ‘तुम्ही भित्रे होतात, आम्ही 40 वार पाठीवर घेतलेत आणि आणखी घेऊ’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला
फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र डागलं. दुसऱ्या राज्यात हे घडलं असतं, तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीका केली आहे. शिव संवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांची रत्नागिरी सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे […]
ADVERTISEMENT

फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र डागलं. दुसऱ्या राज्यात हे घडलं असतं, तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीका केली आहे.
शिव संवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांची रत्नागिरी सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्या एक लाख नोकऱ्या आपल्या राज्यात येणार होत्या, त्या गेल्या कशा? जी पावणेदोन लाखांची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती गेली कशी? जो प्रोजेक्ट शंभर टक्के येणार होता. इथल्या मुलामुलींना नोकऱ्या देणार होता. याची उत्तर तर देत नाहीत, पण आमच्यावर आरोप करताहेत आमच्यामुळे गेला”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिव संवाद यात्रा : फॉक्सकॉन प्रोजेक्ट पुन्हा महाराष्ट्रात; आदित्य ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट
“आम्हाला तुम्ही सरकारमधून बाहेर काढलं. तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात, तर मग हा प्रोजेक्ट हातातून गेला कसा. दुसरा प्रोजेक्ट रायगड लोह्यामध्ये आणणार होतो. बल्क ड्रग्ज पोर्टचा प्रोजेक्ट. महाराष्ट्रात औषधी बनवणाऱ्या कंपना सर्वाधिक आहेत. लस बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्या प्रोजेक्टमुळे ७० ते ८० हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या”, असं सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला प्रकल्प जाण्यासाठी जबाबदार ठरवलं.