Beed : पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये उद्धव ठाकरेंना मिळालं बळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-रोहिदास हातागळे, बीड

Shiv Sena (Uddhav balasaheb thackeray) : एकनाथ शिंदेंनी बंड केला. नवा गट उदयाला आला. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदेंनी थेट आम्हीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा दावा केला. शिंदेंच्या बंडानंतर मूळ शिवसेनेला ठिकठिकाणी खिंडारं पडली. मूळ शिवसेना बाजूला गेली आणि शिंदे गट-ठाकरे गटाने आपली ताकद वाढवण्याकडे लक्ष्य केंद्रीत केलं. शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू असताना आता पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंचा (Pankaja Munde, Dhananjay Munde) दबदबा असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेत (Shiv Sena UBT) स्थानिक नेत्यांची मोठी भरतीच झाली.

बीड म्हटलं की, मुंडे, क्षीरसागर आणि पंडित घराणी नजरेसमोर येतात. सध्या बीड जिल्ह्यात चर्चेत असतात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा जोरात सुरु झाल्या. त्या चर्चांवर पंकजा मुंडे कधी बोलल्या नाहीत, पण पंकजा मुंडे नाराज असल्याची कुजबूज नेहमीच होतं आहे. पण, आता पंकजा मुंडे यांच्या आधी बीडमध्ये ठाकरेंचं काही प्रमाणात बळ वाढलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बीडमधल्या एमआयएम, शिवसंग्राम आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. यानिमित्ताने बीडमधून शिवसेनेत मोठं इनकमिंग झाल्याचं बघायला मिळालं.

Shivsena (UBT) – VBA आघाडीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी होणार घोषणा

ADVERTISEMENT

21 जानेवारी 2023 रोजी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, सुषमा अंधारे इतर नेते उपस्थित होते…

ADVERTISEMENT

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुणी कुणी प्रवेश केला?

एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संतोष जाधव असे बडे नेते शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये काही प्रमाणात भविष्यात बळकटी मिळेलं असं सध्या तरी म्हटलं जात आहे.

Shubhangi Patil : २ तारखेला विजयानंतर मी मातोश्रीवर जाणार नाही!

सध्या बीडमध्ये चर्चेत असलेले नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आहेत. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची आघाडी आहे, असं जरी असलं तरी शिवसेनेमध्ये सुरु असलेलं इनकमिंग हे धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांच्यासाठी डोकेदुखी असणार का? या सगळ्याचा बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या भाजपला आणि धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीच्या मतांना धक्का लावणार ठरेल का? हे आगामी काळात दिसेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT