लव्ह जिहाद : तरुणीच्या आरोपामुळे पोलिसांवर आगपाखड करणाऱ्या नवनीत राणा पडल्या तोंडघशी?

मुंबई तक

अमरावतीत मुलगी बेपत्ता झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला. मुलीला शोधण्यावरून आणि कॉल रेकॉर्ड केल्यानंतर नवनीत राणांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. पण, तरुणी सापडली आणि कथित लव्ह जिहाद प्रकरणाची हवा निघाली. आता सापडलेल्या तरुणीने राणांवरच बदनामीचा आरोप केला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या राणा आता तोंडघशी पडल्याची चर्चा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावतीत मुलगी बेपत्ता झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला. मुलीला शोधण्यावरून आणि कॉल रेकॉर्ड केल्यानंतर नवनीत राणांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. पण, तरुणी सापडली आणि कथित लव्ह जिहाद प्रकरणाची हवा निघाली. आता सापडलेल्या तरुणीने राणांवरच बदनामीचा आरोप केला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या राणा आता तोंडघशी पडल्याची चर्चा सुरू झालीये.

अमरावतीमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मुलीच्या आईवडिलांनी याप्रकरणात मदत करावी म्हणून म्हणून खासदार नवनीत राणा यांना विनंती केली. त्यानंतर नवनीत राणा यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा केला.

नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची

नवनीत राणांनी राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याला फोन केला. अधिकाऱ्यांने कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राभर चर्चेत आलं.

‘माझा कॉल रेकॉर्ड का केला?’ ‘लव्ह जिहाद’वरून नवनीत राणांचा पोलिसांशी वाद; नक्की काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp