मोहिते पाटलांचा पताकाधारी अश्व बलराज आषाढी वारीच्या प्रस्थानासाठी रवाना
अकलुज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा पताकाधारी अश्व बलराज आषाढी वारीच्या प्रस्थानासाठी रवाना झाला. वारीसाठी वर्षभर बलराजला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर रिंगणाची प्रशिक्षणही देण्यात आलीये. देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी देहुच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात […]
ADVERTISEMENT

अकलुज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा पताकाधारी अश्व बलराज आषाढी वारीच्या प्रस्थानासाठी रवाना झाला. वारीसाठी वर्षभर बलराजला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर रिंगणाची प्रशिक्षणही देण्यात आलीये.
देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी देहुच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वाच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ३० वर्षांपूर्वी सुरु केला. त्यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या आई पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली.
आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक पहात असतात वर्षभर बलराजला हरभरा, गुळ, दुध, तूप, गव्हाचा भूस्सा असा खुराक दिला जातो.