BMC च्या ‘फिक्स्ड डिपॉझिट’वर मोदी, फडणवीसांचा डोळा -भास्कर जाधव
– राकेश गुडेकर, रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटवर डोळा दिसतोय, हे त्यांच्या कालच्या भाषणातून आणि कार्यक्रमातून जाणवलं’, असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव […]
ADVERTISEMENT

– राकेश गुडेकर, रत्नागिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटवर डोळा दिसतोय, हे त्यांच्या कालच्या भाषणातून आणि कार्यक्रमातून जाणवलं’, असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी निशाणा साधला आहे.
शिवसेना (UBT) नेते तथा आमदार भास्कर जाधव हे आज चिपळूणमध्ये बोलत होते. पंतप्रधानांनी मुंबई दौऱ्यात विरोधकांना लक्ष्य केलं. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण मी पूर्णपणे ऐकलं, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणं पूर्ण ऐकली.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा एकच गाभा होता. मुंबई महापालिकेची फिक्स्ड डिपॉझिट… मुंबई महापालिकेची बँकेत मोठी ठेव आहे. जवळपास 99 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बँकेत फिक्स्ड डिपॉझिट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत शिवसेनेची जी 25 ते 27 वर्ष सत्ता आहे. त्या कारकिर्दीतील ही सर्व रक्कम आहे. त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.