सोनाली फोगाटचा वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू, आईला केलेला शेवटचा फोन चर्चेत

मुंबई तक

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटचं गोव्यात निधन झालं आहे. गोवा पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे की सोनाली फोगाटचा मृत्यू हार्ट अटॅक आल्याने झाला आहे. मात्र सोनाली फोगाटचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं तिच्या बहिणीने म्हटलं आहे. सोनाली फोगाटने सोमवारी सकाळी आईला फोन केला होता तेव्हा आपल्या जेवणात काहीतरी गडबड वाटते आहे असं तिने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटचं गोव्यात निधन झालं आहे. गोवा पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे की सोनाली फोगाटचा मृत्यू हार्ट अटॅक आल्याने झाला आहे. मात्र सोनाली फोगाटचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं तिच्या बहिणीने म्हटलं आहे. सोनाली फोगाटने सोमवारी सकाळी आईला फोन केला होता तेव्हा आपल्या जेवणात काहीतरी गडबड वाटते आहे असं तिने आईला सांगितलं होतं असंही तिच्या बहिणीने म्हटलं आहे.

सोनाली फोगाटच्या बहिणीने काय म्हटलं आहे?

सोनालीचा सोमवारी आईला फोन आला होता. त्यावेळी तिने आईशी चर्चा केली. तिने हेदेखील सांगितलं की जेवणात काहीतरी गडबड वाटते आहे. तसंच माझ्याविरोधात काहीतरी कट शिजतोय असंही ती म्हणाली होती. सोनालीच्या बहिणीने असंही सांगितलं की ती ठीक आहे असंही म्हणाली होती. तसंच २७ तारखेला घरी येते असंही सांगितलं होतं मात्र तिचा मृत्यू झाला.

रेस्तराँमध्ये काम करत होती सोनाली फोगाट

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाट अस्वस्थ होती. ज्यानंतर तिला गोवा येथील अंजुनाच्या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं. गोवा डिजीप जसपाल सिंह यांनीही सांगितलं की सोनाली फोगाट अंजुना याच ठिकाणी असलेल्या Curlies रेस्तराँमध्ये काम करत होती. या दरम्यान जेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाटच्या शरीरावर जखमेचे कोणतेही वण नाहीत. मात्र पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतरच सोनाली फोगाटचा मृत्यू कसा झाला त्याची माहिती मिळू शकणार आहे. डेप्युटी एसपी जीवबा दाल्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाटला रूग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासणीत तिचा मृत्यू हार्ट अटॅक आल्याने झाल्याचं समोर आलं आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp