Samruddhi Mahamarg : वेगात बस अन् चालक मोबाईलवर पाहतोय कार्यक्रम; पहा Video
Samruddhi mahamarg news : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बस चालवताना चालक कधी मोबाईलकडे पाहतो तर कधी रस्त्याकडे पाहतो. लक्झरी बस भरधाव वेगाने जात आहे. एका प्रवाशाने चालकाचे बेफिकीर कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ते व्हायरल केले.
ADVERTISEMENT

Samruddhi Mahamarg Latest News : सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या नागूपर-मुंबई समृद्धी महामार्गावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एका खासगी लक्झरी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झालं असं की बस चालक बस चालवताना मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. तेव्हा मागून कोणीतरी चालकाच्या या कृतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बसमध्ये नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या संगीत ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच लक्झरी बसचा चालक गाडी चालवताना स्टेअरिंगच्या वर आणि स्पीडो मीटरसमोर मोबाईल ठेवून व्हिडिओ पाहत होता.
वेगात बस आणि कानात हेडफोन्स
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बस चालवताना चालक कधी मोबाईलकडे पाहतो तर कधी रस्त्याकडे पाहतो. लक्झरी बस भरधाव वेगाने जात आहे. चालकाचे हे निष्काळजी कृत्य एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ते व्हायरल केले.