Maratha Protest: जाळपोळ भोवणार; फडणवीस म्हणाले, “त्या आंदोलकांवर जीवे…”
Devendra Fadnavis news : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी खासदार आणि आमदारांच्या घरांना लक्ष्य केले. काही ठिकाणी घरे, वाहने पेटवून देण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ३०७ कलमान्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis on violence in Maharashtra for reservation : शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागलं. विशेषतः बीडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हिंसेचा भडका उडाला. आमदार, लोकप्रतिनिधींची घरं, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. या घटनांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, त्यांच्या विरुद्ध थेट हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखले केले जाणार आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. (Devendra Fadnavis First Reaction on violence rose in Maharashtra)
मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे. त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकेतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरक्षणासंदर्भात वचन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
फडणवीस झाले नाराज; म्हणाले, “हे अतिशय…”
जाळपोळीच्या घटनांवर देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मंत्रिमंडळातील निर्णयही मंत्र्यांनी सांगितले आहेत. पण, याचवेळी लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषतः ज्या प्रकारे काल (३० ऑक्टोबर) काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर, काही लोकांचे हॉटेल, दवाखाने जाळ, प्रतिष्ठाणे जाळं… अशा प्रकारची कारवाई केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे”, अशी चिंता फडणवीसांनी व्यक्त केली.