‘हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता’, गजानन कीर्तीकरांनी संजय निरुपमांचा सगळा इतिहासच सांगितला
शिवसेनेतल्या बंडखोरी नंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतरही गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंच्या गटात होते. मात्र, गेल्या आठवड्यात गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात उडी मारली. त्यावरून त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम आक्रमक झालेत. संजय निरुपमांनी थेट गजानन कीर्तीकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये. राजीनामा मागणाऱ्या निरुपमच्या मागणीवर मौन सोडत कीर्तीकरांनी सगळा इतिहासच सांगून टाकला. खासदार […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या बंडखोरी नंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतरही गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंच्या गटात होते. मात्र, गेल्या आठवड्यात गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात उडी मारली. त्यावरून त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम आक्रमक झालेत. संजय निरुपमांनी थेट गजानन कीर्तीकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये. राजीनामा मागणाऱ्या निरुपमच्या मागणीवर मौन सोडत कीर्तीकरांनी सगळा इतिहासच सांगून टाकला.
खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवेसना पक्षात प्रवेश केला. गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरल्यानं काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी थेट त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याचीच मागणी केली.
गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेणारच! तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही : संजय निरुपम मैदानात
गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश करून मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना धोका दिल्याचं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे. संजय निरुपम यांनी गजानन कीर्तीकरांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. याच मुद्द्यावर बोलताना गजानन कीर्तीकरांनी निरुपम यांना आव्हान दिलंय.