maharashtra gram panchayat election results 2022
maharashtra gram panchayat election results 2022प्रातिनिधिक छायाचित्र/पीटीआय

Gram panchayat election result Live : कोणत्या जिल्ह्यात कोण वरचढ? महाविकास आघाडी की युती?

Gram panchayat election result latest update 2022 : 18 जिल्ह्यातल्या 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

राज्यात १८ जिल्ह्यातल्या ११६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात झालीये. ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीबरोबरच थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काही ठिकाणी महत्त्वाचे कल समोर आले आहेत.

चंद्रपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

एकूण जागा 94

घोषित निकाल 94

काँग्रेस 36

भाजप 30

शेतकरी संघटना 07

गोंडवना गणतंत्र पार्टी 06

वंचित बहुजन आघाडी 03

राष्ट्रवादी काँग्रेस 03

शिवसेना (उद्धव ठाकरे) 01

अपक्ष 08

रत्नागिरीत शिंदे गटाच्या उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का

आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिलाय. निवडणूक झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट-महाविकास आघाडीचे सरपंच जिंकून आले आहेत.

maharashtra gram panchayat election results 2022
रत्नागिरीत उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का; 3 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल काय?

ग्रामपंचायतचा निकाल : भिवंडी जिल्हा

एकुण ग्रामपंचायत-31

निकाल जाहीर - 31

शिवसेना - 14

शिंदे गट - 01

भाजप- 07

राष्ट्रवादी- 00

काँग्रेस- 00

मनसे - 02

इतर-07

मुरबाड तालुका

एकुण ग्रामपंचायत-35

निकाल जाहीर - 34

शिवसेना - 5

शिंदे गट - 14

भाजप- 12

राष्ट्रवादी- ००

काँग्रेस- ००

इतर-०3

बहिष्कार:- 02