कुलर ठरला किलर? नाशिकमध्ये आजोबा आणि नातू यांचा मृत्यू

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक कुलरच्या हवेतून किटकनाशकचा द्रव पसरल्यामुळे आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील महड या गावांमध्ये घडली आहे. घरासमोर थुंकल्याचा राग, अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून; आरोपी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

कुलरच्या हवेतून किटकनाशकचा द्रव पसरल्यामुळे आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील महड या गावांमध्ये घडली आहे.

घरासमोर थुंकल्याचा राग, अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून; आरोपी अटकेत

बागलाण तालुक्यातील महड येथे जीभाऊ सोनवणे यांचा शेतात राहत होते. दिवसभराच्या कामानंतर कुटुंब रात्रीचे जेवण आटोपून झोपण्यासाठी गेले. आजी, आजोबा, नातू आणि आणखी एकजण कुलरच्या थंडगार हवेत खोलीत झोपले. कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर मोकळ्या हवेत झोपले. सकाळी खोलीत झोपलेल्या चौघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

हे वाचलं का?