अबब! रुग्णाच्या पोटातून काढला तब्बल 1 किलोचा किडनी स्टोन; शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर म्हणाले...

भारतातील मुतखड्यावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. आशिष पाटील दिली आहे.
अबब! रुग्णाच्या पोटातून काढला तब्बल 1 किलोचा किडनी स्टोन; शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर म्हणाले...

रोहिणी ठाकूर

धुळे: धुळ्यातील नामांकित डॉ. आशिष पाटील यांनी शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलोचा मुतखडा काढून शेतकऱ्याला जीवनदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्याची नोंद केली आहे. भारतातील मुतखड्यावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. आशिष पाटील दिली आहे.

रमण चौरे वय 50, रा. नंदुरबार असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना अनेक महिन्यापासून मुतखड्याचा त्रास असल्याने अनेक ठिकाणी जाऊन ही त्यांचे निदान न झाल्याने शेतकऱ्यावर धुळ्यातील डॉ. आशिष पाटील यांनी तेजनक्ष हॉस्पिटल मध्ये 1 तासाच्या अथक परिश्रमातुन शेतकऱ्याच्या कंबरेतुन मुतखड्याला बाहेर काढण्यात डॉ आशिष पाटील यांना यश आले आहे.

शस्त्रक्रियेनंतर डॉ. आशिष पाटील काय म्हणाले?

डॉ. आशिष पाटील म्हणाले की जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास जाणवू लागला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. मुतखडा एवाढा मोठा होईपर्यंत वाट पाहू नका त्याने तुम्हाल इतर आजार होऊ शकतात. तुम्ही मुतखड्याचा आजार जास्त काळ अंगावर काढला तर किडनी फेल होऊ शकते, कर्करोग होऊ शकतो त्याचबरोबर किडनीचे अन्य आजार होऊ शकतात असे डॉक्टर म्हणाले आहेत.

इंडिया बुक व आशिया बुक ऑफमध्ये रेकॉर्ड नोंदवला गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले '' हा रेकॉर्ड मुतखड्याच्या पिशवीमधून खडा काढण्याचा झाला आहे. याअगोदरचा विश्वविक्रम ९ सेमीचा होता.'' पुढे डॉक्टर म्हणाले '' आम्हाला १ तास रुग्णाच्या मुतखड्यापर्यंत पोहोचायला गेले, त्यानंतर २०-२५ मिनीट मुतखडा कंबरेतून काढायला गेले. कारण हा खडा एवढा मोठा होता की तो रुग्णाच्या कंबरेत अडकला होता. रुग्णाची परिस्थिती उत्तम आहे आणि लवकरच तो बरा होऊन घरी जाईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in