Chandrayaan 3 Update : विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर काय करणार?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Chandrayan-3 moon landing chandrayaan 3 news in marathi : Vikram reached the moon, Pragyan's walk also started what work will lander and Rover do now?
Chandrayan-3 moon landing chandrayaan 3 news in marathi : Vikram reached the moon, Pragyan's walk also started what work will lander and Rover do now?
social share
google news

Vikram Lander Pragyan Rover : अमेरिका, चीनसारखे हे जगातील मोठे देश जे कधीच करू शकले नाहीत, ते भारताच्या शास्त्रज्ञांनी करुन दाखवलं. गेल्या आठवड्यात जे करण्यात रशियाला अपयश आले ते आपल्या शास्त्रज्ञांनी केले आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भूपृष्ठवर पाय ठेवताच भारताने इतिहास रचला. (Did Pragyan rover came out of Vikram Lander?)

23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचा अत्यंत कठीण टप्पा पार पडला. विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर देशभरात टाळ्यांचा कडकडाट झाला. पण, टाळ्यांच्या कडकडाटापूर्वी काही सेकंदासाठी देशवासीयांचा श्वास थांबला होता. पण यावेळी शास्त्रज्ञांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं.

विक्रम लँडर सुरक्षितपणे चंद्रावर उतरले. पण, आता तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय काम करणार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विक्रम लँडरवरील चार पेलोड्स काय काम करणार?

1) रंभा (RAMBHA)… हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि बदल तपासेल.

2) चास्टे (ChaSTE)… हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.

ADVERTISEMENT

3) इस्ला (ILSA)… हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपीय क्रियांची तपासणी करेल.

ADVERTISEMENT

4) लेझर रेट्रोरिफ्लेक्टर (Laser Retroreflector Array (LRA)… हे चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

Exclusive >> Chandrayaan-3 Vikram लँडरने नुकतेच पाठवले चंद्राचे नवे फोटो!

प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत, ते काय करणार?

1) लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. खनिजांचाही शोध घेईल.

2) अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS). हे घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, कथील आणि लोह. लँडिंग साइटभोवती चंद्राच्या पृष्ठभागावर याचा शोध घेतला जाईल.

वैज्ञानिकांना काय फायदा…

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर एकत्रितपणे चंद्राचे वातावरण, पृष्ठभाग, रसायने, भूकंप, खनिजे इत्यादींचा अभ्यास करतील. यामुळे इस्रोसह जगभरातील शास्त्रज्ञांना भविष्यातील अभ्यासासाठी माहिती मिळणार आहे. संशोधन करणे सोपे जाईल. ही बाब शास्त्रज्ञांसाठी फायद्याची ठरली आहे.

भारताला कसा फायदा होईल?

हे यश मिळवणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. यापूर्वी हा विक्रम अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत युनियन) आणि चीनने स्थापित केला होता.

इस्रोचा काय फायदा होणार…

ISRO ही जगभरात कमी खर्चात व्यावसायिक प्रक्षेपणासाठी ओळखली जाते. आतापर्यंत 34 देशांचे 424 परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. सोबत 104 उपग्रह सोडले आहेत. तेही एकाच रॉकेटमधून. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला. चांद्रयान-2 चे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. त्यानेच चांद्रयान-3 साठी लँडिंग साईट सापडली. मंगळयानाचा महिमा संपूर्ण जगाने पाहिला आहे. चांद्रयान-3 च्या यशामुळे जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांमध्ये इस्रोचे नाव समाविष्ट होईल.

याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.

पेलोड्स म्हणजेच चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या अंतराळ यानांमध्ये बसवलेली उपकरणे नंतर हवामान आणि दळणवळण उपग्रहांमध्ये वापरली जातात. संरक्षण विषयक उपग्रहांमध्ये वापरले जातात. नकाशा बनवणाऱ्या उपग्रहांमध्ये आढळते. ही उपकरणे देशातील लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्यामुळे संपर्क यंत्रणा विकसित होण्यास मदत होते. देखरेख करणे सोपे होते.

वाचा >> Chandrayaan 3 : ज्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताने इतिहास रचला ते एस सोमनाथ कोण आहेत?

चंद्रावर फक्त एका दिवसाची मोहीम का?

चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. 23 ऑगस्ट रोजी सूर्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उगवेल. दिवस येथे 14 दिवस राहील. यामुळे चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करणार आहेत.

14 दिवस सूर्याचा आधार घेऊन प्रज्ञान करणार काम

1) चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यांची मोहीम पार पाडण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करेल.

2) चंद्रावर 14 दिवस दिवस आणि पुढील 14 दिवस रात्र असते, जर चांद्रयान चंद्रावर अशा वेळी उतरले असते की तिथे रात्र असते, तर ते काम करू शकले नसते.

3) सर्व गोष्टींची गणना केल्यानंतर, इस्रोने निष्कर्ष काढला की 23 ऑगस्टपासून चंद्राचा दक्षिण ध्रुव सूर्याने प्रकाशित होईल.

4) तेथे 14 दिवसांचा रात्रीचा कालावधी 22 ऑगस्ट रोजी संपत आहे.

5. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश असेल, ज्याच्या मदतीने चांद्रयानचे रोव्हर चार्ज करू शकेल आणि आपले मिशन पूर्ण करू शकेल.

इस्रो चंद्रावर सोडेल राजमुद्रेची छाप

लँडिंगसह, लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांनी त्यांचे काम सुरू केले आहे. लँडर विक्रमच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर, सहा चाकी रोव्हर प्रज्ञान रॅम्पमधून बाहेर आला आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर फिरू लागला. ते 500 मीटरपर्यंतच्या परिसरात फिरून तेथील पाणी आणि वातावरणाबद्दल इस्रोला सांगेल. या दरम्यान त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.

17 मिनिटांची धाकधूक अन् भारताला यश मिळाले

गेल्या 4 वर्षांच्या तयारीचा परिणाम म्हणजे चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरणे अचूक ठरले. या संपूर्ण मोहिमेसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी 17 मिनिटे. याच 17 मिनिटांत चांद्रयान-2 च्या आशा संपल्या होत्या. या वेळेचं वर्णन इस्रोने टेरर ऑफ 17 मिनिट्स म्हटले होते. तो अडथळा पार करून भारताने चंद्रावर आपला ठसा उमटवला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT