Iran war: काय आहे इराणचं 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस', ज्यामुळे इस्रायलमध्ये माजलीये खळबळ?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Iran attacks on Israel : गेल्या सहा महिन्यांपासून गाझासोबत युद्ध लढणाऱ्या इस्रायलचं संकट कमी होण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे गाझामधल्या हमासच्या बंडखोर संघटनेसोबत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे इराणनेही इस्रायलवर हल्ला केला आहे. शनिवारी (13 एप्रिल) रात्री उशिरा इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. 200 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केल्याचा दावा करण्यात आला आहे. (Iran war What is Iran's Operation True Promise causing so much fear in Israel)

इस्रायलवरील या हल्ल्याला इराणने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस' असे सांकेतिक नाव दिले आहे. इराणचे म्हणणे आहे की, त्यांनी 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस' हे सांकेतिक नाव दिले आहे जेणेकरुन ते आपल्या मित्रांना आणि शत्रूंना सांगू शकतील की, ते जे काही बोलतात त्याचे पालन करतात. खरी वचने कशी द्यायची हे त्यांना माहीत आहे. ते जे वचन देतात ते पाळतात. सीरियातील आपल्या दूतावासावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी इस्रायलवर हा भयानक हल्ला केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 'जो बिडेन' यांची इस्रायला खंबीर साथ?

या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नेतन्याहू म्हणतात की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याबद्दल आणि शक्य ती सर्व मदत देण्याबाबत बोलले आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर डेलावेअर येथील आपल्या खासगी निवासस्थानी सुट्टी घालवणारे राष्ट्राध्यक्ष बिडेन व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. त्यांच्या आगमनानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा दलाची बैठक झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेतान्याहू यांनी व्यक्त केली वचनबद्धता...

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, "इस्रायल मजबूत आहे. आमचे लोकही मजबूत आहेत. अमेरिकेसोबत ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांच्या समर्थनाचे आम्ही आभार मानतो. जो कोणी आमच्यावर हल्ला करेल, आम्ही त्याच्यावर हल्ला करू, असे स्पष्ट तत्त्व मी मांडले आहे. आम्ही प्रत्येक धोक्यापासून स्वतःचे रक्षण करू. देशाची संरक्षण यंत्रणा कामाला लागली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला सोमोरे जाण्यासाठी तयार आहोत."

दूतावासाच्या मृत्यूचा इराणने उगवला सूड 

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये 1 एप्रिल रोजी इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. इस्रायलच्या या हल्ल्यात इराणच्या वरिष्ठ कमांडरसह 13 जण ठार झाले. मृतांमध्ये इराणच्या एलिट कुड्स फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर-जनरल मोहम्मद रजा जाहेदी आणि त्यांचे डेप्युटी ब्रिगेडियर-जनरल मोहम्मद हादी यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतरच इराणने सूड घेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर हा हल्ला झाला.

ADVERTISEMENT

इस्रायलवरील या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये जल्लोष करण्यात आला. रात्री उशिरा शेकडो लोक मध्य तेहरानमध्ये जमले आणि मोर्चा काढला. यावेळी लोकांनी पॅलेस्टाईनची सशस्त्र संघटना हमास आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाहचे झेंडे फडकावले आणि 'डाऊन विथ इस्त्रायल' आणि 'डाऊन विथ अमेरिका'च्या घोषणा दिल्या. इराणने इस्रायलच्या भूमीवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यानंतर इराणमधील अनेक शहरांमध्ये जल्लोषही झाला आहे.

ADVERTISEMENT

भारताने व्यक्त केली चिंता!

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यावर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'इस्रायल आणि इराणमधील वाढत्या शत्रुत्वामुळे आम्ही गंभीरपणे चिंतित आहोत. त्यामुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. आम्ही तात्काळ डी-एस्केलेशन, संयम, हिंसाचारापासून माघार घेण्याचे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन करतो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात असतात.'


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT