Supriya Sule Net Worth: सुप्रिया सुळेंची 'एवढी' संपत्ती, सदानंद सुळेंकडे तर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळेंची नेमकी किती संपत्ती?
सुप्रिया सुळेंची नेमकी किती संपत्ती?
social share
google news

Supriya Sule Property Lok Sabha Election 2024: बारामती: बारामती लोकसभा निवडणूक (Baramati Lok Sabha Election) ही सध्या सर्वात चर्चेत असणारी निवडणूक आहे. कारण इथे पवार विरुद्ध पवार असाच सामना आहे. त्यातच आज (18 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी प्रतिज्ञापत्रातून त्यांची नेमकी किती संपत्ती आहे हे आता समोर आलं आहे. (lok sabha election 2024 baramati supriya sule net worth total property election affidavit reveals wealth)

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, यासोबतच सुप्रिया सुळे यांची नेमकी संपत्ती किती याविषयी आता नेमकी माहिती समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्याकडे 38 कोटी रुपये किंमतीची स्थूल मालमत्ता इतकी आहे. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची तब्बल एक अब्ज 14 कोटी एवढी प्रचंड संपत्ती आहे. 

पाहा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची नेमकी किती संपत्ती:

2022-2023 मध्ये नेमके किती उत्पन्न - 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • सुप्रिया सुळे यांचे 2022-2023 मध्ये 1  कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये उत्पन्न होते
  • सदानंद सुळे यांचे 2022-2023 मध्ये 3 कोटी 90 लाख 02 हजार 220 उत्पन्न होते

बँकेतील एकूण ठेवी - 

  • सुप्रिया सुळे यांच्या बँकांमध्ये तब्बल 11 कोटी 83 लाख 29 हजार 195 रुपयांच्या ठेवी आहेत.
  • सदानंद सुळे यांच्या बँकांमध्ये तब्बल 2 कोटी 57 लाख 74 हजार 150 आहेत.

किती कोटींचे शेअर्स?

ADVERTISEMENT

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे 16 कोटी 44 लाख 24 हजार 140 रुपयांचे शेअर्स आहेत.
  • सदानंद सुळे यांच्याकडे 33 कोटी 57 लाख 58 हजार 962 रुपयांचे शेअर्स आहेत.

राष्ट्रीय बचत योजनेत किती गुंतवणूक

ADVERTISEMENT

  • सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय बचत योजनेत 7 लाख 13 हजार 500 रुपये एवढी गुंतवणूक आहे
  • सदानंद सुळे यांची राष्ट्रीय बचत योजनेत  16 लाख 34 हजार 030 रुपये एवढी गुंतवणूक आहे 

कोणाला किती कर्ज दिले? 

  • सुप्रिया सुळे यांनी 3 कोटी 50 लाख 86 हजार 080 रुपयांचे कर्ज दिले आहे.
  • सदानंद सुळे यांनी 60 कोटी 8 लाख 71 हजार 253 रुपयांचे कर्ज दिले आहे.

रोख रक्कम किती?

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे 42 हजार 500 रोख रक्कम आहे.
  • सदानंद सुळे यांच्याकडे 56 हजार 200 रोख रक्कम आहे.

सोनं किती? 

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपये किंमतीचं सोनं आहे
  • सदानंद सुळे यांच्याकडे 1 कोटी 13 लाख 81 हजार 855 रुपये किंमतीचं सोनं आहे

चांदी किती?

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदी आहे
  • सदानंद सुळे यांच्याकडे 17 लाख 62 हजार 72 रुपयांची चांदी आहे

हिऱ्याच्या वस्तू किती?

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे एक कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये किंमतीच्या हिऱ्यांच्या वस्तू आहेत.
  • सदानंद सुळे यांच्याकडे एक कोटी 62 लाख 74 हजार 253 रुपये रुपये किंमतीच्या हिऱ्यांच्या वस्तू आहेत.

एकूण स्थूल मालमत्ता किती?

  • सुप्रिया सुळे यांची एकूण स्थूल मालमत्ता ही तब्बल 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये एवढी आहे. 
  • सदानंद सुळे यांची एकूण स्थूल मालमत्ता ही तब्बल 1 अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये एवढी आहे.

शेतजमीन किती?

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपयांची शेतजमीन आहे.
  • सदानंद सुळे यांच्याकडे 4 कोटी 66 लाख 26 हजार 094 रुपयांची शेतजमीन आहे.


सुप्रिया सुळे यांनी कोणाकडून किती कर्ज घेतलं आह? 

  • सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रुपये आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये एवढं कर्ज घेतलं असल्याचं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

 


 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT