लडाख बस दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील विजय शिंदे यांचाही मृत्यू, गावावर शोककळा
लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आज सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची […]
ADVERTISEMENT

लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आज सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला.
लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत.