Ketki chitale ला आता Atrocity कायद्यानुसार अटक, ठाणे कोर्टाने सुनावली ५ दिवसांची कोठडी
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून तिला आता Atrocity कायद्यानुसार अटक झाली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे सेंट्रल जेलमधून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय? राष्ट्रवादी […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून तिला आता Atrocity कायद्यानुसार अटक झाली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे सेंट्रल जेलमधून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आलं.
शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करा. सत्र न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरूवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.
केतकी चितळेविरोधात २०२० मध्ये अनुसुचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसुचित जातींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅडव्होकेट स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरूवारी कारवाई करत तिला अटक केली. यामुळे आता केतकी चितळेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.