आमदार रत्नाकर गुट्टेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, अटक होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिलीप माने, परभणी: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर मारहाण आणि विनयभंग प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून आता याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

गंगाखेड तालुक्यातील बन पिंपळा येथील शेत जमिनीवरून गुट्टे आणि गावातील शेषराव कोरके यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या वादातून हा प्रकार झाल्याचं समोर आलं आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे हे आपल्या 30 ते 35 साथीदारांसोबत आपल्या शेतात आले आणि त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून, मारहाण केल्याचं कोरके यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. सोबतच विनयभंग केल्याचंही या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जिल्ह्यातील आमदाराच्या विरोधामध्ये अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्याने, राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांना इन्कार केला असून, जी जमीन अस्तित्वात नाही त्यावरून हा प्रकार घडल्याचं सांगितलं आहे. केवळ राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तक्रारीत नेमके काय आरोप करण्यात आले?

ADVERTISEMENT

आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, 20 मे रोजी (शुक्रवार) फिर्यादी आणि त्यांचे पती शेषेरावजी दोघे शेतात काम करीत असताना आमदार रत्नाकर गुट्टे, हनुमान लटपटे आणि त्यांच्यासोबत तब्बल 30 ते 35 जण हे तीन बोलेरो कारसह थेट शेतामध्ये घुसले.

ADVERTISEMENT

यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या पतीने या सर्वांना शेतातून तुम्ही निघून जाण्यास सांगितलं. हे आमचं शेत आहे, तुम्ही निघून न गेल्यास आम्ही तुम्हाला याच शेतामध्ये जेसीबीने खड्डा खोदून खडयात पुरून टाकू अशी धमकी गुट्टे आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय या सर्वांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार देखील यावेळी करण्यात आली आहे. पीडित महिलेने केलेल्या या आरोपानंतर आता आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात रत्नाकर गुट्टे यांना अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोर्तुगीज महिलेचा विनयभंग करणाऱ्या आर्मी जवानाला पोलिसांनी केली अटक

दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे हे वादात अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्यांना एका प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. तुरुंगात असतानाच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून देखील आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT