Andheri bypoll : निवडणूक आयोगाकडे नोटाच्या प्रचाराची तक्रार, भाजपचा उल्लेख करत अनिल परबांचा गौप्यस्फोट
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सोपा नसल्याचं सातत्यानं बोललं जातंय. याला कारण दिलंय जातंय ते अंधेरी विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या नोटाचा प्रचार. काही कथित ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या होत्या. पण, आता ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केलीये. ठाकरे गटाने नोटाचा प्रचार करणाऱ्यांच्या क्लिप्सही निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्यात. […]
ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सोपा नसल्याचं सातत्यानं बोललं जातंय. याला कारण दिलंय जातंय ते अंधेरी विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या नोटाचा प्रचार. काही कथित ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या होत्या. पण, आता ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केलीये. ठाकरे गटाने नोटाचा प्रचार करणाऱ्यांच्या क्लिप्सही निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्यात. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माहिती दिलीये.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि अनिल परब यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी नोटाच्या प्रचाराबद्दल माहिती दिलीये.
नोटाचा प्रचार सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर परब म्हणाले, “आमच्याकडे जी माहिती आलेली आहे. त्यात असं कळतंय की काही लोकांना पैसे देऊन ‘नोटा’ची बटण दाबण्यासाठी लोकांना नोटा दिल्या जात आहेत. नोटा आणण्याचं कारण असं आहे की, नोटाचा वापर कमी व्हावा. प्रत्यक्षात नोटांचा वापर कमी व्हावा. नोटांचा वापर ‘नोटा’साठी केला जात असल्याची माहिती आम्हाला दररोज मिळतेय.”
अनिल परब पुढे म्हणाले, “यासंदर्भात मी निवडणूक आयोगात आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. ज्या भागातून ही माहिती मिळतेय, त्या भागांची नावं आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला दिली आहेत”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.