१ नोव्हेंबपासून कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट सक्तीचा, मुंबई वाहतूक पोलिसांचा नवा आदेश
मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट लावणं सक्तीचं असणार आहे. मुंबई पोलिसांना हा नियम अनिवार्य केला आहे. आत्तापर्यंत नियम असा होता की ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीला सीट बेल्ट लावणं अनिवार्य होतं आता मात्र कारमध्ये जेवढे लोक बसले […]
ADVERTISEMENT

मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट लावणं सक्तीचं असणार आहे. मुंबई पोलिसांना हा नियम अनिवार्य केला आहे. आत्तापर्यंत नियम असा होता की ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीला सीट बेल्ट लावणं अनिवार्य होतं आता मात्र कारमध्ये जेवढे लोक बसले आहेत त्या सगळ्यांना सीट बेल्ट लावणं सक्तीचं असणार आहे. १ नोव्हेंबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
गेल्या महिन्यात सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू
मागच्या महिन्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर सीट बेल्टची चर्चा चांगलीच रंगली होती. या अपघाताच्या बातम्या आल्या तेव्हा बेल्ट लावणं किती गरजेचं असतं याच्या चर्चा झाल्या होत्या. कारण सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा मागच्या सीटवर बसले होते आणि त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता.
मुंबई वाहतूक पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?
मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेल्या नव्या नियमानुसार १ नोव्हेंबरपासून कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट लावणं हे सक्तीचं असणार आहे. समजा चार लोकांची आसन क्षमता आहे तर चारही जणांनी सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे. १ नोव्हेंबरपासून ज्या कारमध्ये सीट बेल्ट लावणाऱ्या व्यक्ती दिसणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असंही मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
सेफ कार प्रवासाचा पहिला टप्पा सीट बेल्ट
तुम्ही कारने प्रवास करत असाल आणि तो प्रवास जर सुरक्षित करायचा असेल तर सगळ्यात आधी सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही सीट बेल्ट लावणं खूप आवश्यक आहे. सीट बेल्ट लावणं हे लोकांना बंधनकारक वाटतं मात्र जिवाच्या सुरक्षेसाठी ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने सीट बेल्ट लावलाच पाहिजे असं आता मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
ज्या कारमध्ये सीट बेल्ट नाही त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत
ज्या कारमध्ये सीट बेल्ट सर्व आसनांसाठी नाही त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच या महिना अखेर पर्यंत या प्रत्येकाने प्रत्येक आसनासाठी सीट बेल्ट लावून घेणं आवश्यक असणार आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.