Rain Update: महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र भागात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातलं ट्विट केलं आहे. मुसळधार पाऊस वाढल्याने लोकांचे घरी जायलाही त्रास होतो आहे कारण मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार

पश्चिम मध्य आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. ओदिशा, महाराष्ट्र आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्या आहे असंही होसाळीकर यांनी म्हटलं आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी

महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महिन्याच्या सुरूवातीला कमी झालेला पाऊस आज वाढला आहे. आता पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रशासनाला सतर्क राहण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी, नाशिक (Nashik) या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शिवाय कोकण (Kokan), पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई-ठाण्यात कोसळधार

मुंबई आणि ठाणे परिसरात आज सांयकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. मात्र, त्याची तीव्रता वाढून तो मुसळधार झाला. परिणामी ठाणे शहरांतील रस्त्यांवर पाणी साठलं. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र, वातावरणातील काळोख आणि वातावरणातील दमटता कायम आहे.

ADVERTISEMENT

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पावसाला पूरक वातावरण निर्माण होत आहे. परिणामी मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम, मध्य महाराष्ट्रासह उर्वरीत महाराष्ट्रातही हलका, मध्यम आणि मुसळधार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. इतरही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरपाचा पाऊस कोसळतो आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT