केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, तरीही तुरुंगात राहावं लागणार..वाचा कारण
शरद पवारांबाबत वादग्रस्त कविता पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतल्या रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर केतकी चितळेला जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाला असला तरीही केतकी चितळेला घरी जाता येणार […]
ADVERTISEMENT

शरद पवारांबाबत वादग्रस्त कविता पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतल्या रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर केतकी चितळेला जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर झाला असला तरीही केतकी चितळेला घरी जाता येणार नाही, तिचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. शरद पवार यांच्याबाबत जी आक्षेपार्ह कविता केतकीने पोस्ट केली होती त्या प्रकरणी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत केतकीला ठाणे येथील कारागृहातच रहावं लागणार आहे.
शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?
याआधी झालेल्या युक्तीवादात केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी अॅट्रोसिटी गुन्ह्यात लावण्यात आलेलं कलम योग्य नाही असा युक्तिवाद केला होता. तर केतकीच्या अॅट्रोसिटी जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील अमित कटारमवरे यांनी बाजू मांडली होती. केतकीला जामीन मिळाला आहे तरीही तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे कारण शरद पवारांविषयी तिने जी पोस्ट केली होती त्या प्रकरणी २१ जून ला सुनावणी होणार आहे.