लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने ठोठावला ३ लाख ६६ हजारांचा दंड, कारण काय आहे माहित आहे?

जाणून घ्या यामागचं नेमकं कारण आहे तरी काय?
Lalbaug Raja Sarvjanik Gaensh Utsav Mandal Fined 3 Lakh 66 Thousand By Mumbai Mahapalika
Lalbaug Raja Sarvjanik Gaensh Utsav Mandal Fined 3 Lakh 66 Thousand By Mumbai Mahapalika

लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला मुंबई महापालिकेने ३ लाख ६६ हजारांचा दंड ठोठावला आहे. लालबागचा राजा हा मुंबईत नवसाला पावणाऱ्या गणपतींपैकी एक आहे. या राजाची विसर्जन मिरवणूक ही मुंबईत कायमच चर्चेचा विषय असते. अशात याच लालबाग राजा गणेश उत्सव मंडळाला मुंबई महापालिकेने ३ लाख ६६ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबईतल्या लालबाग राजा गणेश उत्सव मंडळाला दंड

मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला मुंबई महापालिकेने ३ लाख ६६ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या मंडळाने गणेश उत्सवात मंडप बांधण्यासाठी फुटपाथवर ५३ तर रस्त्यावर १५० खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला. मुंबई महापालिकेने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

गणेश उत्सवाच्या काळात मुंबईतील गणेश उत्सव मंडळं दरवर्षी मंडप बांधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून संमती घेत असतात. ही संमती दिलीही जाते. अनेक मंडळं मंडप बांधण्यासाठी फुटपाथवरचे पेव्हरब्लॉक हटवून त्या ठिकाणी खड्डे खणतात. तसंच काही ठिकाणी रस्त्यावरही खड्डे खणले जातात. गणेश उत्सव झाल्यानंतर या सगळ्याचा आढावा मुंबई महापिकेकडून घेतला जातो.

हा आढावा घेतल्यानंतर मुंबई महापालिका दंड ठोठावत असते किंवा कारवाई करत असते. त्याप्रमाणे यावर्षी आता मुंबई महापालिकेने लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजारांचा दंड ठोठावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in