SSC result 2022: राज्याचा निकाल ९६.९४ टक्के, कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी...

दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
SSC result 2022: राज्याचा निकाल ९६.९४ टक्के, कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी...
Maharashtra SSC result 2022(फाइल फोटो)

पुणे: दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे (Maharashtra SSC result 2022). बारावीच्या निकालातही कोकण विभागाने पहिला नंबर मिळवला आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.२७ टक्के लागला आहे. नाशिक विभाग यामध्ये तळाला राहिला आहे.

सालाबादप्रमाणे यंदाचा निकालातही मुलींनी पहिला क्रमांक पटकावला आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर ९६.०६ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. म्हणजेच मुला-मुलींच्या निकालाची तुलना केली तर १.०८ टक्के मुली जास्त उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातून १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यानी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभाचा सर्वाधीक म्हणजेच ९९.२७ टक्के निकाल लागला आहे तर नाशिकचा ९५.९० टक्के निकाल लागल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाने दिली आहे.

दहावीचा विभागनिहाय निकाल

पुणे: ९६.१६

नागपूर: ९७.००

औरंगाबाद: ९६.३३

मुंबई: ९६.९४

कोल्हापूर: ९८.५०

अमरावती: ९६.८१

नाशिक: ९५.९०

लातूर: ९७.२७कोकण: ९९.२७

राज्यात गेल्या वर्षी कोरोनाने थैमान घातलेले असताना परीक्षा न घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. यंदा कोरोनाचा प्रार्दुभाव कमी असल्याने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धीतने झाल्या होत्या. आज १ वाजल्यापासून https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-10-2022 या वेबसाईटवरती निकाल पाहता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in