RS Polls : नवाब मलिक-अनिल देशमुखांची मतदानासंदर्भातली विनंती याचिका कोर्टाने फेटाळली

ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे
RS Polls : नवाब मलिक-अनिल देशमुखांची मतदानासंदर्भातली विनंती याचिका कोर्टाने फेटाळली
ED opposes application filed by Deshmukh and Malik to vote during RS poll

राज्यसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात एक एक मतासाठी जुळवाजुळव सुरू आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेजण दोन आरोपांखाली तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावं ही विनंती या दोघांनीही कोर्टाला केली होती. मात्र कोर्टाने ठाकरे सरकारला धक्का दिला असून आता या दोघांचीही मतदानाला जाता यावं ही याचिका फेटाळली आहे. १० जून म्हणजेच शुक्रवारी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाला या दोघांनाही जाता येणार नाही. कोर्टाने या दोघांचीही विनंती याचिका फेटाळली आहे.

एक एक मत महत्त्वाचं मानलं जात असताना राष्ट्रवादीसाठी या दोन नेत्यांची याचिका फेटाळली जाणं धक्का मानलं जातं आहे. हायकोर्टात जाण्याचा पर्याय या दोघांकडे आहे. मात्र ईडीने उत्तर नोंद करण्यासाठी आणखी वेळ मागितला तर मात्र या दोघांना दिलासा मिळणं कठीण होणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं दिसतं आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघेजण रूग्णालयात आहे. भाजपने या दोघांना मुंबईत आणलं आहे. या दोघांनाही रूग्णवाहिकेतून मतदानासाठी आणलं जाणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनाही कोर्टाने संमती दिलेली नाही. एक-एक मत महत्त्वाचं असताना हा महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जातो आहे.

१० जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधल्या कलम ६२ नुसार कैदेत असणाऱ्या व्यक्तीसाठी हा औपचारिक अधिकार आहे तो मुलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे कैदेत असलेल्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी संमती देऊ नये असं ईडीने म्हटलं आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संमती मिळावी यासाठीचा अर्ज माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतल्या सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. या अर्जाची दखल घेतल कोर्टाने ईडीला दोन्ही अर्जांवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर हे उत्तर देण्यात आलं होतं. ईडीने अखेरच्या दिवसापर्यंत हे तंगवत ठेवलं आणि आता ही संमती नाकारली गेली आहे. आता पुढे नेमकं काय काय होणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in