पांढऱ्या पट्टीचा वाद गिरगावात मराठी मुलांनी काय दिला इशारा?

मुंबई तक

girgaon white strip : गिरगावातील मंगलवाडी परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठी संघटनांनी या प्रकारावर आक्षेप घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ADVERTISEMENT

girgaon white strip
girgaon white strip
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पांढऱ्या पट्टीचा वाद गिरगावात मराठी मुलांनी काय दिला इशारा?

girgaon white strip : गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील मंगलवाडी येथे रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी घाटकोपरमध्ये जैन मुनींना चालण्यासाठी रस्त्यावर पांढरे पट्टे काढल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर गिरगावातही अशाच प्रकारची तक्रार समोर आली. स्थानिक नागरिक आणि ‘आम्ही गिरगावकर’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण गल्लीमध्ये कुठेही पांढरा पट्टा नसताना एका विशिष्ट इमारतीसमोरच असा पट्टा काढण्यात आला होता. या प्रकारानंतर परिसरात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर संबंधित पट्टीवर डांबर टाकून ती बुजवण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा : महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार, आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...

पट्ट्यांची आवश्यकता आता का निर्माण झाली?

स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, हा मुद्दा कोणत्याही समाजाविरोधात नसून सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे विशेष चिन्हांकन का केले जाते, हा त्यामागील मुख्य प्रश्न आहे. काही कार्यकर्त्यांनी दावा केला की, ज्या व्यक्तींनी ही पट्टी काढण्याचे काम केले त्यांनाही त्यामागील कारणांची स्पष्ट माहिती नव्हती. पुढे स्थानिक रहिवाशांकडून ही पट्टी जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र याच पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, यापूर्वी अनेक वर्षे धर्मगुरू या भागात येत होते, मग अशा प्रकारच्या पट्ट्यांची आवश्यकता आता का निर्माण झाली? सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही एका घटकासाठी वेगळी व्यवस्था केली जात असेल तर त्याबाबत स्पष्ट नियम आणि परवानग्या आहेत का, याबाबतही विचारणा करण्यात आली.

हेही वाचा : 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन, आहेत तरी कुठे?