कॉन्स्टेबलचा घटस्फोटित नर्सवर बलात्कार, पोलीसही कारवाईला घाबरले
एका कॉनस्टेबलने नर्सचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिरोजाबादमधील ही घटना असून गेल्या दोन वर्षांपासून हा लैंगिक छळाचा प्रकार सुरु होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कॉन्स्टेबलचा घटस्फोटित नर्सवर बलात्कार
पोलीस कारवाईला घाबरले
Crime News : मेहुणीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आणि विरोध केल्यावर तिला मारहाण केल्याचा गंभीर आरोप एका पोलीस हवालदारावर करण्यात आला आहे. पीडित महिलेने स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने तक्रार नोंदवून घेतली असून आरोपी हवालदाराला पुढील महिन्यात न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
दोन वर्षांपासून शारीरिक शोषण
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद मधील रामगड परिसरातील रहिवासी असलेली ही महिला घटस्फोटित असून ती नर्स म्हणून काम करते. तिने दिलेल्या माहितीनुसार, तिचा मेहुणा हेड कॉन्स्टेबल राजेश कुमार (रा. सम्राटनगर, रामगड) सध्या गाझियाबाद येथील सीओ कार्यालयात तैनात आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत आहे. राजेशने 1 सप्टेंबर 2024, 9 ऑक्टोबर 2024 आणि 14 फेब्रुवारी 2025 रोजी तिच्यावर अत्याचार केले. यासंदर्भात तिने रामगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र राजेशने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दबाव आणून कोणतीही कारवाई होऊ दिली नाही.
हे ही वाचा : BJP महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह बोलला, भाजपच्या नेत्याला अटक
निर्जनस्थळी नेऊन अत्याचार
त्यानंतर 18 मे 2025 रोजी सकाळी नऊच्या सुमारास पीडित महिला घरी जात असताना राजेश दोन-तीन अनोळखी लोकांसह तिथे आला. त्यांनी तिला बळजबरीने गाडीत घालून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर तिने उत्तर पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु तेथेही गुन्हा दाखल झाला नाही. याप्रकरणी एसएसपींकडे ऑनलाईन तक्रार पाठवूनही काहीच पाऊल उचलले न गेल्याने अखेर तिने न्यायालयात अर्ज दाखल केला.
हे ही वाचा : पुण्यात आल्यानंतर पहिल्या बॉयफ्रेंडला विसरली, एका प्रियकराने केला दुसऱ्याचा मर्डर
न्यायालयात हजर करण्याचे आदेश
न्यायालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेत ती दाखल करून घेतली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी विजय कुमार वर्मा (द्वितीय) यांच्या न्यायालयाने 29 जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना उत्तर पोलीस ठाण्याला आरोपी हवालदाराला 10 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणात अद्याप न्यायालयाचा असा कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
