महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार, आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...
Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'मुळे खळबळ उडाली असून, शिवसेना (UBT) चे अनेक खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार
आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...
Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ने वेग पकडला असून, यामुळे शिवसेना (UBT) मध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील सहा लोकसभा खासदार पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. राजकीय हालचाली वाढल्या असून, काही खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. शिवसेनेचे बंडखोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट देणार असल्याचे समजते, जिथून या संपूर्ण मोहिमेची सूत्रे हलवली जात आहेत.
हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…
बंडखोर खासदारांची रणनीती अत्यंत स्पष्ट असल्याचे दिसते. ते प्रथम लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा करतील आणि त्यानंतर त्याचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. या ऑपरेशनमध्ये श्रीकांत शिंदे यांचे दिल्लीतील निवासस्थान केंद्रबिंदू ठरले आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) ने या फुटीला रोखण्यासाठी कंबर कसली असून, त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपली बाजू मांडल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची विनंती केली आहे. पक्षाने 10 व्या अनुसूचीनुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
हेही वाचा : 'मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच', उत्तर महाराष्ट्रातील 'या' खासदाराने भूमिका केली स्पष्ट









