मुंबईची खबर: BMC चा 22 कोटींचा मास्टरप्लॅन! आता नाल्यांमध्ये अजिबात कचरा दिसणार नाही... पावसाळ्यात चिंताच मिटली
शहरातील नद्या आणि नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा रोखण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बीएमसीने 22 कोटी रुपयांचा मास्टरप्लॅन तयार केला आहे.

बातम्या हायलाइट

BMC चा 22 कोटींचा मास्टरप्लॅन!

नाल्यांमध्ये अजिबात कचरा साचणार नाही...

काय आहे बीएमसीचा नवा प्लॅन?
Mumbai News: दर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या मुंबईसाठी बीएमसी प्रशासनाने एक मोठं पाऊल उचललं आहे. शहरातील नद्या आणि नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा रोखण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बीएमसीने 22 कोटी रुपयांचा मास्टरप्लॅन तयार केला आहे. या योजनेअंतर्गत, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या आणि मोठ्या चॅनल्सवर कचराकुंड्या (Trash Barriers) बसवल्या जातील.
सुमारे 3.6 कोटी रुपये खर्च
BMC च्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत मुंबईतील तीन प्रमुख नद्या - मिठी, पोईसर आणि दहिसर - तसेच प्रमुख नाल्यांमध्ये तरंगणारा प्लास्टिक, बाटल्या आणि इतर कचरा अडवला जाणार आहे. यानंतर, हा कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल. नदी किंवा नाल्याच्या स्वच्छतेसाठी सुमारे 3.6 कोटी रुपये खर्च येईल. एकूणच, ही योजना शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला एक नवीन दिशा देईल.
नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर कचरा साचतो, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो आणि सखल भागात पाणी साचतं. नुकतंच, ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने मिठी नदीला पूर आला होता आणि अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
हे ही वाचा: Govt Job: तरुणांनो! आता LIC मध्ये मिळवा सरकारी नोकरी... कसा आणि कधीपर्यंत कराल अर्ज?
बीएमसी अधिकाऱ्यांनी दिली माहिती...
बीएमसीच्या मते, या नवीन योजनेच्या अंमलबजावणीनंतर पावसाळ्यात कचऱ्यामुळे नाले आणि नद्यांमध्ये अडथळा येणार नाही. अशा प्रकारे, शहरातील रस्ते पाण्यात बुडणार नाहीत आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा प्रकल्प ग्रीन आणि सस्टेनेबल म्हणजेच शाश्वत दृष्टिकोन लक्षात घेऊन बांधण्यात आला आहे. यामुळे नाले आणि नद्यांची स्वच्छता करणे सोपे होईल, तसेच पर्यावरणाचं नुकसानही कमी होईल.
हे ही वाचा: बापरे! मुलीच्या मागे लागला साप अन् महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला... नेमकी घटना काय?
नागरिकांना आवाहन
या योजनेचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहावा म्हणून स्थानिक लोकांना नाले आणि जलाशयांमध्ये कचरा टाकू नका, असं आवाहन करण्यात आले आहे. हा मास्टरप्लॅन लागू झाल्यानंतर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या जुन्या समस्येपासून मुंबईला सुटका मिळणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.