मुंबईची खबर: आजपासून मुंबई मेट्रो 4 च्या चाचणीला सुरूवात... 'या' प्रवाशांना होणार अधिक फायदा

मुंबई तक

प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या फेजवर सोमवार म्हणजेच आजपासून चाचणी सुरू झाली.

ADVERTISEMENT

आजपासून मुंबई मेट्रो 4 च्या चाचणीला सुरूवात...
आजपासून मुंबई मेट्रो 4 च्या चाचणीला सुरूवात...
google news

बातम्या हायलाइट

point

आजपासून मुंबई मेट्रो 4 च्या चाचणीला सुरूवात

point

'या' प्रवाशांना होणार अधिक फायदा

Mumbai News: प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या फेजवर सोमवार म्हणजेच आजपासून चाचणी सुरू झाली. डोंगरीपाडा आणि गायमुख स्थानकांदरम्यानच्या  4.638 किमी मार्गावर चाचणी सुरू झाली आहे. आता पुढील वर्षापासून घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोपा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सकाळी 10:30 वाजता गायमुख मेट्रो स्टेशनपासून ट्रायल सुरू झाली आहे. 

10.5 किमी अंतरावर धावणार मेट्रो

एमएमआरडीए कडून पहिल्या टप्प्याअंतर्गत मेट्रो-4, मेट्रो-4 A च्या 10.5 किमी मार्गावर सेवा सुरू करण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. मात्र, ट्रायल रन म्हणजेच मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी पूर्ण 10 किमी मार्गावर वीज पुरवठ्याचं काम पूर्ण न झाल्यामुळे 22 सप्टेंबरपासून केवळ 4.638 किमी मार्गावर ट्रायल रन सुरू झालं आहे. 

हे ही वाचा: Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये 'या' पदांसाठी निघाली मोठी भरती! लाखोंचा पगार अन्... लवकरच करा अप्लाय

उर्वरित मार्गावर आवश्यक व्यवस्था आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा ट्रायल रन सुरू केलं जाईल. ट्रायल रन सुरू करण्यासाठी मेट्रोच्या 4.638 किमी मार्गावर 30 ऑगस्टपासून वीजपुरवठा सुरू झाला होता. ओव्हरहेड वायर चार्जिंग आणि ट्रेन चार्जिंगची चाचणी प्रक्रिया 21 दिवसांतच पूर्ण झाली आहे.

हे वाचलं का?