आईचं चिमुकल्यासोबत निर्घृण कृत्य! एका वर्षाच्या मुलाला पूलावरून खाली नदीत... अमरावतीत घडली भयानक घटना
अमरावती मधील तिवसा येथे एका महिलेने तिच्या मुलासोबत निर्घृण कृत्य कृत्य केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खरंतर, आईने आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पुलावरून खाली नदीत फेकण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आईने एका वर्षाच्या मुलाला पूलावरून खाली नदीत...

अमरावतीत घडली भयानक घटना
Shocking Incident: अमरावती मधील तिवसा येथे एका महिलेने तिच्या मुलासोबत निर्घृण कृत्य कृत्य केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खरंतर, आईने आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पुलावरून खाली नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचू शकला. त्या मुलाला वाचवण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लोकांचे प्रयत्न सुरू होते.
बाळाला पुलावरून खाली फेकण्याचा प्रयत्न...
गुरुवारी (18 सप्टेंबर) संबंधित महिला तिवासा शहरातील पिंगळाई नदीच्या पुलावर तिच्या एक वर्षाच्या मुलासोबत उभी होती. अचानक, तिने तिच्या मुलाला रेलिंगवरून लटकवलं आणि ती त्याला नदीत फेकून देणार असताना लोकांनी ते सगळं पाहिलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. महिलेने तिच्या बाळाला पुलावरून खाली फेकण्याचा प्रयत्न करताच, जवळच्या रहिवाशांनी आरडाओरडा केला आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. जवळपास 20 मिनिटे मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर, पोलिसांनी महिलेला शांत करून त्या निष्पाप मुलाचा जीव वाचवला.
हे ही वाचा: हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने केला 'तो' कारनामा! पत्नीला मृत घोषित केलं अन्... अखेर पीडितेनं काय केलं?
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
महिलेने आपल्या मुलासोबत असं निर्घृण कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. संबंधित महिलेचा पती तिच्यावर अत्याचार करत असल्यामुळे कौटुंबिक वादाला कंटाळून तिने हे पाऊल उचललं असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: "तुझ्यासारख्या कितीतरी 300 रुपयांत..." पतीने असं म्हटलं अन् प्रकरण थेट पोलिसात... 'ते' रहस्य उघडकीस
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
या प्रकरणासंबंधी तिवसा पोलीस स्टेशनचे अधिकारी गोपाला उपाध्याय यांनी सांगितलं की, "या घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसून आमची प्राथमिकता महिलेला समजावणं आणि मुलाला सुरक्षितपणं वाचवणं, ही होती. पोलिसांनी महिलेला समजावून तिला आपल्या मुलासह घरी पाठवलं." या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंगळाई नदीच्या पुलावर नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे.